Nashik Water Crisis: विहिरींनी गाठलायं तळ, पाण्याचा बसेना मेळ! राजापूरला तीव्र पाणीटंचाई, टँकरची संख्या वाढविण्याची मागणी

सध्या तीन टॅंकरने पाणीपुरवठा होत असला, तरी वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी अपुरे पडत असल्याने टँकरची संख्या वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
File Photo
File Photoesakal

येवला : तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर परिसरातील विहिरीच्या जलस्त्रोतांनी केव्हाच तळ गाठल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. गेल्या दहा महिन्यापासून येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

सध्या तीन टॅंकरने पाणीपुरवठा होत असला, तरी वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी अपुरे पडत असल्याने टँकरची संख्या वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Severe water shortage in Rajapur demand to increase number of tankers nashik news)

राजापूर म्हणजे वर्षांनुवर्ष टँकरग्रस्त गाव, अशी ओळख होती. मध्यंतरी लोहशिंगवे, तसेच वडपाटी येथून गावासाठी दोन पाणी योजना केल्याने पाणीटंचाईतून काहीअंशी सुटका झाली होती.

मागील वर्षी या परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने पावसाळ्यात विहिरी कोरड्याठाक झाल्या होत्या. परिणामी, पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता.

आता परिस्थिती अजून भयानक असून, वाढत्या उन्हासह जलस्त्रोत व विहिरींचे पाणीही आटत आल्याने टंचाईची तीव्रता वाढत आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने पाणी योजनाही बंद पडल्याने गाव व वाडे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

सध्या नागरिकांना गावालगतच्या वाड्यावस्त्यांवरून पाणी आणावे लागत आहे. टँकरचे पाणी एवढ्या मोठ्या गावाला किती पुरणार हा प्रश्न असल्याने पाण्यासाठी कुटुंबाची भटकंती सुरू आहे.

File Photo
Latur Water Crisis : जळकोटला ९० टक्के जलस्रोत तळाला; हिवाळ्यापासूनच तालुक्यात पाण्याची टंचाई

गावालगाच्या वाड्यावरचे कूपनलिका व विहिरी आता कोरड्या होऊ लागल्याने आगामी काळात पाणी कसे उपलब्ध करावे, हाही प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनापुढे ठाकला आहे.

तालुक्यातील पाचव्या क्रमांकाचे मोठे गाव असल्याने येथील लोकसंख्येसह वाड्या वस्त्यांचा मोठा विस्तार झाला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार टँकरची संख्या वाढवावी, अन्यथा येथील महिला आंदोलन करणार आहेत.

गाव व परिसरासाठी टँकरच्या खेपा वाढवाव्यात, अशी मागणी माजी सरपंच व सदस्य सुभाष वाघ, सरपंच वंदना आगवन, उपसरपंच विजय ठाकरे, सदस्य नलिनी मुंढे, वंदना सानप, दत्ता सानप, ज्ञानेश्वर दराडे, अलका सोनवणे, लताबाई जाधव, राजेंद्र आव्हाड, धनराज अलगट, शरद आगवन, सचिन जाधव, दामू सोनवणे आदींनी केली आहे.

"राजापूर परिसरातील पाणीटंचाईची समस्या वर्षांनुवर्षाची असून, मागील वर्षापासून टंचाईची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दोन्ही योजना बंद पडल्याने गावालाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. लोकसंख्या व पाणीटंचाईचा विचार करून प्रशासनाने टँकरची संख्या वाढवावी व ग्रामस्थांना दिलासा द्यावा."

- सुभाष वाघ, माजी सरपंच तथा सदस्य, राजापूर

File Photo
Nashik Water Crisis: नांदगावला पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य! 15 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com