नाशिक- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची संख्या वाढविण्याबरोबरच अस्तित्वातील प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या निविदाप्रक्रियेत ठराविक ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून अटी व शर्ती तयार केल्याने वादात सापडलेल्या निविदांची तपासणी करण्याचा निर्णय नगरविकास विभागाकडून घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाला सूचना दिली आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती.