नळावाटे घरात गटारीचे पाणी; गणेशवाडी परिसरातील महिला त्रस्त

sewage water reference latest marathi news
sewage water reference latest marathi newsesakal

नाशिक : मंगळवार (ता. १९) पासून गणेशवाडी परिसरातील अनेक भागांतील नळांच्या पाण्यातून थेट गटारीचे पाणी (Sewage Water) येत असल्याने महिला त्रस्त आहे. त्यामुळे अनेक महिलांनी पिण्यासाठी नळाच्या पाण्याऐवजी जारचे पाणी विकत घेण्यास पसंती दिली आहे.

पाणीपुरवठा विभागाने या भागातील पाण्याचे नमुने गोळा केले असले तरी ऐन पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. (Sewage water through tap in house Women suffering in Ganeshwadi area nashik latest Marathi news)

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धो-धो पावसानंतर या भागातील अनेक घरांतील नळांना येणाऱ्या पाण्याला गटारीच्या पाण्याचा उग्र वास येत आहे. त्यामुळे अनेक महिलांनी पिण्यासाठी नळाच्या पाण्याऐवजी बाहेरून झार मागविला आहे.

गणेशवाडी, सहजीवननगर, शेरी मळा, जुना आडगाव नाका हा कष्टकरी, मध्यमवर्गीय अशा संमिश्र वस्तीचा भाग आहे. या ठिकाणी गत अनेक दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू होता. मंगळवारपासून चक्क गटारीचे पाणी नळाला येत असल्याने महिला त्रस्त आहेत. या पाण्याला गटारीच्या पाण्यासारखा उग्र दर्प येतो.

sewage water reference latest marathi news
रेल्वेच्या 3 उड्डाणपुलांचे प्रस्ताव नाकारले

पाण्याचे नमुने गोळा

याबाबत येथील रहिवाशांनी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे विभागीय अभियंते नरेंद्र शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तातडीने विभागाचा कर्मचारी परिसरात पाठविला. संबंधितांनी पाण्याचे नमुने गोळा केले आहेत. आता गुरुवारी (ता. २१) सकाळी संपूर्ण लाइनची तपासणी करण्याचे आश्‍वासन श्री. शिंदे परिसरातील रहिवाशांना दिले. संततधारेमुळे आधीच सर्वच दवाखाने हाऊसफुल्ल आहेत. त्यात आता दूषित पाण्याची भर पडून लोकांना डायरिया, मळमळ असे विकार सुरू झाले आहेत.

त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने याची तातडीने दखल घेऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आहे. याबाबत आमदार ॲड. राहुल ढिकले, महापालिका विभागीय अधिकारी कैलास राभडिया यांच्याशी संपर्क साधला असता ते ‘नॉट रिचेबल’ असल्याचे दिसून आले.

"गणेशवाडी परिसरातील नळाच्या पाण्याचे नमुने घेतले आहेत. आता गुरुवारी सकाळी संपूर्ण लाइनची तपासणी करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करू."

- नरेंद्र शिंदे, अभियंते, पाणीपुरवठा विभाग, पंचवटी.

"नळाच्या पाण्याला मंगळवारपासून गटारीचा उग्र दर्प येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या भीतीने कालपासून पिण्यासाठी जारचे पाणी वापरत आहोत, पण हे कुठवर चालायचे, त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा व्हावा." - लीलाबाई केंढे, गृहिणी, गणेशवाडी

sewage water reference latest marathi news
ओबीसींचे राज्यात राजकीय आरक्षण कायम राहिल्याचा अधिक आनंद : छगन भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com