SNR26B22991
पंचाळे ः एस. जी. विद्यानिकेत विद्यालयातील खेळाडूंसमवेत मार्गदर्शक शिक्षक.
-------------------
एस. जी. विद्यानिकेतनचे मैदानी स्पर्धेत यश
-------------
सिन्नर, ता.७ ः पंचाळे येथील एस. जी. विद्यानिकेतन विद्यालयाने विविध मैदानी स्पर्धेत यश मिळविले. जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे या स्पर्धा झाल्या. कराटे, मैदानी क्रीडा, धनुर्विद्या आणि तायक्वांदो या विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
कराटे स्पर्धेत १३ खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यापैकी ९ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तेजस्विनी पवार, कार्तिकी ठाकरे, वैष्णवी नरोडे, रूपाली निकम, समीक्षा पवार, साई थोरात, आकाश थोरात, श्लोक बेलोटे, ऋषिकेश सैंद्रे यांनी कराटे स्पर्धेत यश मिळविले.
१७ वर्षे आतील गटात आरोही जाधव, स्वामिनी नवले यांनी द्वितीय, तर अनुष्का हांडोरे, सिद्धीका शांताराम नवले यांनी तृतीय क्रमांक मिळविला. दोनशे व पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत शुभम थोरात याने प्रथम क्रमांक मिळविला. ११० मीटर हर्डल्समध्ये अजय सोंगाळ याने बाजी मारली. रिले स्पर्धेत यश थोरात, आदित्य कांगणे, अथर्व डुंबरे, संदेश ढोकने, शुभम थोरात यांनी यश मिळविले.
१९ वर्षांखालील रिले स्पर्धेत साईराज बेलोटे, अथर्व डुंबरे, पंकज साळुंखे, यश चतुर याने द्वितीय तर भालाफेक स्पर्धेत गौरव नवले याने तृतीय क्रमांक मिळविला. ६०० मीटर धावण्यात तनुजा डुंबरे, ८० मीटर हर्डल्स व १०० मीटर धावण्यातही ती द्वितीय आली. ११० हर्डल प्रकारात खुशी आहेर हीची जिल्हास्तरासाठी निवड झाली. खुशी आहेर हिची ११० मीटर हर्डल्स या प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. विशाल घुले याने क्रॉस कंट्री सहा किलोमीटर धावण्यात यश मिळविले. जिल्हास्तरासाठी त्याची निवड झाली आहे.
---------------
धनुर्विद्या स्पर्धेत समीक्षा गडाख हिने १९ वर्षे वयोगटात यश मिळविले. तिची विभागस्तरासाठी निवड झाली. मनकर्णिका देशमुख हिने तायक्वांदोमध्ये विभागस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. दीपक थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे सचिव राजेश गडाख, मुख्याध्यापक विलास पवार, व्यवस्थापक राजेंद्र गडाख, उच्च माध्यमिक विभागप्रमुख प्रवीण शेलार, प्राथमिक मुख्याध्यापक नवनाथ थोरात यांनी यशस्वितांचा गौरव केला.
-------------