''शबरी नॅचरल्स''च्या पॅकेजिंगला जपानचा ''ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड''

''शबरी नॅचरल्स''च्या पॅकेजिंगला जपानचा ''ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड''
Published on: 
फोटो : 32597 आदिवासी विकास विभागाचे शबरी नॅचरल्स अवॉर्ड ... शबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगला जागतिक ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ वारली, गोंडी कलेतून आदिवासी संस्कृतीला जागतिक ओळख सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृती, कला आणि नैसर्गिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या शासनाच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या ‘शबरी नॅचरल्स’ ब्रँडच्या पॅकेजिंगला प्रतिष्ठेचा ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. जपान इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन प्रमोशनतर्फे हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी या ब्रँडला ‘इंडिया डिझाईन मार्क’ पुरस्कारही मिळाला आहे. आदिवासी संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने महामंडळाच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी हा ब्रँड विकसित केला. पॅकेजिंगमध्ये वारली, गोंडी आणि चित्रकथी चित्रकलेसह आदिवासी समाजाच्या पारंपरिक दंतकथा, जीवनशैली आणि निसर्गप्रेमाचे कल्पक दर्शन घडवण्यात आले आहे. शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून मध, मोहफुलांपासून तयार केलेली उत्पादने, चारोळी आणि बांबूच्या वस्तूंसह नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादनांची विक्री केली जाते. आकर्षक पॅकेजिंगमुळे या उत्पादनांना प्रीमियम स्वरूप मिळाले आहे. सांस्कृतिक मूल्य, शाश्वतता आणि नावीन्यपूर्ण सादरीकरणासाठी या डिझाईनची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली. कोट या पुरस्कारामुळे शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक ओळख आणि विश्वासार्हता मिळण्यास मदत होईल. तसेच आदिवासी बांधवांच्या रोजगाराला व शाश्वत विकासाला चालना मिळेल. - प्रा. डॉ. अशोक उईके, मंत्रील आदिवासी विकास ‘शबरी नॅचरल्स’ला जागतिक व्यासपीठावर मिळालेली ओळख अभिमानास्पद असून या यशाचे खरे मानकरी आदिवासी बांधव आहेत. पुरस्कारामुळे जबाबदारीही वाढली आहे. - लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com