‘चला, आदिवासी संस्कृती जाणू या!’ हेरिटेज वॉक

‘चला, आदिवासी संस्कृती जाणू या!’ हेरिटेज वॉक
Published on: 
फोटो : 31215 नाशिक : ‘शबरी नॅचरल्स’विषयी माहिती देताना आयुक्त लीना बनसोड. … आदिवासी संस्कृतीचा वारसा उलगडला ‘हेरिटेज वॉक’मधून ‘शबरी नॅचरल्स’च्या माध्यमातून आदिवासी उत्पादनांना बाजारपेठ; नागरिक, अभ्यासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : महाराष्ट्राच्या समृद्ध आदिवासी वारशाची सर्वसामान्यांना जवळून ओळख व्हावी, या उद्देशाने गडकरी चौकातील आदिवासी विकास भवन येथे शुक्रवारी (ता. २) ‘चला, आदिवासी संस्कृती जाणू या!’ या विशेष हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले. इतिहास, संस्कृती, पर्यटन आणि आदिवासी जीवनपद्धतीचा अभ्यास करणारे नागरिक, अभ्यासक व संस्कृतीप्रेमींनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त लीना बनसोड यांनी आदिवासी समाजाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोकजीवन, निसर्गस्नेही कला आणि बदलत्या काळातील विकास सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली. आदिवासी बांधवांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती देण्यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेल्या नैसर्गिक व दर्जेदार वस्तूंना ‘शबरी नॅचरल्स’ या प्रीमियम ब्रँडच्या माध्यमातून बाजारपेठेत स्वतंत्र ओळख मिळवून दिली जात असल्याची माहिती बनसोड यांनी दिली. हेरिटेज वॉकदरम्यान सहभागी नागरिकांनी आदिवासी सांस्कृतिक दालनाला भेट देत पारंपरिक अवजारे, वाद्ये, वारली चित्रकला, वेशभूषा, हस्तकला तसेच दैनंदिन जीवनातील विविध वस्तूंची माहिती घेतली. या माध्यमातून आदिवासी समाजाची जीवनशैली आणि सांस्कृतिक परंपरा जवळून समजून घेण्याची संधी मिळाली. ‘शबरी नॅचरल्स’ ठरले विशेष आकर्षण वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याने स्वतः पुढाकार घेत ‘शबरी नॅचरल्स’ सारख्या उपक्रमाची आपुलकीने माहिती देणे दुर्मिळ असल्याचे उपस्थित अभ्यासक व नागरिकांनी नमूद केले. आदिवासी संस्कृतीचे जतन करतानाच आदिवासी बांधवांना आर्थिक प्रवाहाशी जोडण्यासाठी विभागाकडून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com