-------------
पान-२ मेन
---------------
फोटो : 34581
शहादा : पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष अभिजित पाटील. शेजारी वसीम तेली, अकिल बागवान, मनीष चौधरी, कपिल मालचे, सुरेश चव्हाण, ॲड. दानिश पठाण, नासीर बेलदार, डॉ. नाझीम, उमेश पाटील.
शहादा पालिकेला रस्ते कामांसाठी पाच कोटींचा निधी
जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता : रस्त्यांची होणार पुनर्बांधणी, दुरुस्ती
शहादा, ता. ५ : जिल्ह्यातील शहादा नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) सर्वसाधारण योजना २०२६-२७ अंतर्गत शहरातील रस्त्यांची पुनर्बांधणी व दुरुस्तीसाठी पाच कोटी ३१ लाख ७७ हजार ३३ रुपयांच्या निधीस जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी प्रशासकीय मान्यता दिली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, हा निधी कोणा एका व्यक्तीचा नसून पालकमंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, प्रशासन व शहादेकरांच्या सामूहिक लढ्याचा आहे, अशी माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी येथील पालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
..........
अभिजित पाटील यांनी येत्या १ डिसेंबरपूर्वी शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचा मानस असल्याचेही सांगितले.
नगरसेवक वसिम तेली, अकिल बागवान, मनीष चौधरी, कपिल मालचे, सुरेश चव्हाण, ॲड. दानिश पठाण, नासिर बेलदार,डॉ. नाझीम, उमेश पाटील आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, की निधीसाठी केलेल्या उपोषणाला शहाद्यातील नागरिकांसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, शिक्षक संघटना, व्यापारी संघटना, डॉक्टर, वकील, पत्रकार यांसह विविध घटकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे लोकसंख्येच्या निकषानुसार पाच कोटी ३१ लाख ७७ हजारांचा निधी मंजूर करून जिल्हा प्रशासनाने दिलेला शब्द पाळला आहे.
श्रेयवादाची लढाई नको
निधीचे खरे श्रेय नागरिकांचे असून, विकास हा कोणा एका व्यक्तीमुळे किंवा गटामुळे होत नाही. सामूहिक प्रयत्नातून हा निधी मिळाला आहे. त्यामुळे कोणीही या निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. श्रेय घेणाऱ्यांनी पाच कोटी ३१ लाखांचा निधी कसा मिळाला, याचा अभ्यास करावा. श्रेयवादात न पडता सर्वांनी एकत्र येऊन रस्ते कामांचे भूमिपूजन केल्यास शहरवासीयांपर्यंत चांगला संदेश जाईल. भविष्यात अपेक्षित कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली. निधीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, आमदार राजेश पाडवी, चंद्रकांत रघुवंशी, डॉ. अभिजित मोरे, अरुण चौधरी, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, अशोक बागूल, प्रकाश जैन तसेच सर्व नगरसेवक व शहरवासीयांचे सहकार्य लाभल्याचे अभिजित पाटील म्हणाले.
........
चौकट करणे
या रस्त्यांचा होणार विकास
प्रमुख कामांत शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्यासाठी ९२ लाख ५९ हजार ९९६ रुपये, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्यासाठी ९२ लाख ४३ हजार ५३१ रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सिद्धार्थनगरपर्यंत रस्त्यासाठी ७१ लाख १२ हजार ३४९ रुपये, स्टेट बँक ते जुनी मोहिदा चौफुलीपर्यंत रस्त्यासाठी ८६ लाख १८ हजार ६७३ रुपये, सरवर मंडप ते आनंद बॅटरीपर्यंत रस्त्यासाठी ९४ लाख ६२ हजार ३९६ रुपये, भारत पेट्रोलपंप ते नवा प्रकाश रोडपर्यंत रस्त्यासाठी ९४ लाख ८० हजार ८८ रुपये याप्रमाणे निधी मंजूर झाला. या सर्व कामांसाठी शासन हिस्सा ४५ लाख २० हजार ४७९ रुपये असून, पालिकेचा १५ टक्के हिस्सा सात लाख ९७ हजार ६५५ रुपये असणार आहे.
------------
कोट------ (बातमीच्या एका बाजूला वापरणे. मधोमध वापरू नये.)
पासपोर्ट फोटो : 34521 (माधवी पाटील)
नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहाद्यातील पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली या कामांची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानाच्या शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे मुख्याधिकाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. कामाची गुणवत्ता राखत ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे प्रशासनाने निर्देश आहेत. आमदार राजेश पाडवी यांच्या पाठपुराव्यामुळे ही मंजुरी मिळाली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार पाडवी यांनी पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी कार्यालयात नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. आमदार पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. हा निधी शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
- माधवी पाटील, उपनगराध्यक्षा, शहादा