Nashik News : शाहु जोंधळे, रिया गाडेकरचा राष्ट्रीय स्तरावर डंका! आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे गौरव

Participants
Participantsesakal

किरण कवडे : सकाळ विशेष

Nashik News : चित्र व शिल्पकलेतून सामाजिक जाणिवा मांडणारे ललितकला महाविद्यालयाचे शिल्पकार शाहु जोंधळे व रिया गाडेकर यांच्या कलाविष्काराची राष्ट्रीयस्तरावर निवड झाली आहे. पाण्याखालील जीवनाचे वास्तव मांडणारे शाहुचे शिल्प हे मुंबईतील आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे गौरविण्यात आले.

फुटपाथवर झोपलेली व्यक्ती स्वत:चे पांघरून कुत्रालाही देते, हा मानवी दृष्टिकोन दाखवणारे रियाचे शिल्प हे बॉम्बे आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे निवडले. या राष्ट्रीय सन्मानामुळे नाशिकच्या शिल्पकलकारांची मान अभिमानाने उंचावली आहे. (Shahu Jondhale Riya Gadekar national level sting Honored by Art Society of India Nashik News)

शाहु जोंधळे व रिया गाडेकर हे मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या ललितकला महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी विविध संकल्पनांवर आधारित शिल्प साकारले. मुंबईतील प्रसिद्ध आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मुंजा नरवाडे व शिक्षक महेश अडबल, अविनाश आडके व विक्रम आंबरे यांनी प्रोत्साहित केले.

यापूर्वी सहभागी झालेल्या स्पर्धेत अपयश पदरी पडले म्हणून निराश झालेल्या रियाने या स्पर्धेतही सहभागी होण्यास नकार दिला. परंतु, प्राध्यापक व प्राचार्यांच्या आग्रहास्तव त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांचे शिल्प निवडले गेले. कुंभारी (ता. निफाड) येथील शाहु जोंधळेने पाण्याखालील जीवनाचे चित्र साकारले आहे.

त्याची कलाकृतीही परीक्षकांना भावली. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांना गौरविण्यात आले. दोघांचाही राष्ट्रीयस्तरावर सन्मान झाल्याने संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यासह कार्यकारी मंडळातर्फे त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच चालू शैक्षणिक वर्षात २६ कलाकृतींची राज्यस्तरावर निवड झाली आहे.

आशिष सोमवंशीला राज्यस्तरीय पुरस्कार

इंटिरिअर डिझाईन व डेकोरेशनचा विद्यार्थी आशिष सोमवंशीने पंचसूत्रीवर आधारित रेस्टॉरंटचे मॉडेल साकारले. याबद्दल त्याला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. रेस्टॉरंटमध्ये बसल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात असल्याची अनुभूती येते, असे हे अफलातून मॉडेल परीक्षकांच्या पसंतीस उतरले.

सातपूरला राहत असलेल्या आशिषच्या घरी आई, वडील, आजोबा हे फर्निचर बनवण्याचे काम करतात. त्यांच्यासोबत काम करून आशिष सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Participants
Abdul Sattar : शेतीच्या नुकसानीबाबत 5 तारखेनंतर निर्णय; कृषिमंत्री अब्दुल सत्तार

रियाचे वडील रिक्षाचालक

मेरी व म्हसरुळ भागातील रहिवासी असलेल्या रिया गाडेकरचे वडील आजही रिक्षा चालवतात. आई, वडील, छोटी बहिण व आजीसह राहणाऱ्या रियाने दहावीनंतर मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेतले.

यानंतर तिच्या लक्षात आले की आपली आवड आणि शिक्षण हे भिन्न प्रकारचे आहे. त्यामुळे तिने इंजिनिअरिंग सोडले आणि ललितकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. दुसऱ्याच वर्षी तिच्या शिल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली.

"ललितकला महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी राष्ट्रीयस्तरावर तर २६ कलाकृती या राज्यस्तरावर निवडल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून कलाकृती शिकवल्यामुळे दरवर्षी आमच्या महाविद्यालयात विविध स्तरावर पारितोषिक मिळते. इंटिरिअर डेकोरेशन विभागातील आशिष सोमवंशीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला."

- पुंजा नरवाडे, प्राचार्य, ललितकला महाविद्यालय

"फुटपाथवर झोपलेली व्यक्ती आपल्यासोबत कुत्र्यालाही पांघरून घालते, या शिल्पातून मानवी दृष्टिकोन हा गरीब किंवा श्रीमंत असा भेद करत नाही, हे दाखवले आहे. माझे शिल्प राष्ट्रीय स्तरावर निवडल्याचा आनंद झाला. भविष्यात मला स्टुडिओ सुरु करायचा आहे. तसेच शासकीय नोकरीसाठी प्रयत्नशील राहणार आहे."- रिया गाडेकर, विद्यार्थिनी,ललितकला महाविद्यालय

"पाण्याखालील जीवन कसे असेल याचे वास्तववादी शिल्प साकारले. त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याचा मनस्वी आनंद आहे. आई, वडील व आजोबा हे गेल्या ४० वर्षांपासून गणपती बनवतात. हा व्यवसाय मोठा करण्याचा विचार आहे. तसेच स्टुडिओच्या माध्यमातून आपली कला जोपासण्याचा विचार आहे." - शाहु जोंधळे, विद्यार्थी, ललितकला महाविद्यालय

Participants
Citylinc Meeting : तोटा कमी करण्यासाठी शाळांच्या बस फेऱ्यांमध्ये कपात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com