Saptashrungi Devi
sakal
वणी: ‘‘शताक्षी नयने ब्रम्हांड स्वामिनी देखियली.. शाक फळे तव प्रजा पोषिली.. मार्कन्डेय सप्तपर्वते दुर्गा स्थापिली सप्तशृंग भगवती आज शाकंभरीस पुजिली.., राधा- कृष्ण.., गोपाळ कृष्ण...असे भजन राधामंत्र, कृष्ण गायत्री मंत्रांचे मंगलस्वर त्यात श्री भगवती सप्तशृंगी माते की जय'' चा जयजयकारात शाकंभरी पौर्णिमेच्या उत्सवाची शनिवारी (ता.३) सांगता झाली. यानिमित्त राधा-कृष्ण महायागास विविध भाजीपाला, वनस्पतींची पूर्णाहुती देण्यात आली. दरम्यान शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सुमारे ऐशी हजारावर भाविक आदिमाये चरणी नतमस्तक झाले.