शालार्थचा ‘मास्टरमाईंड’ भाऊसाहेब चव्हाणला दणका

शालार्थचा ‘मास्टरमाईंड’ भाऊसाहेब चव्हाणला दणका
Published on: 
शालार्थ आयडी घोटाळा (लोगो करणे) ------------- ‘मास्टरमाईंड’ भाऊसाहेब चव्हाणला दणका मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला .... सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : राज्यभर गाजत असलेल्या सुमारे १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाचा मास्टरमाईंट असलेला तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. चव्हाण याने एकेका शिक्षकाकडून बनावट शालार्थसाठी तब्बल किमान तीन लाखांची रक्कम उकळली असून, उत्तर महाराष्ट्रातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे शिक्षकांना त्याने बनावट शालार्थ आयडीचे ‘वाटप’च केले. यातून कोट्यावधीची माया त्यांनी गोळा केली. नाशिक रोड पोलिस ठाण्यात शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा २०२५ मध्ये दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपास स्वतंत्र विशेष तपास पथकाचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. २०२२ ते २०२४ या कालावधीत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नाशिक विभागाचा तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण याने शिक्षण संस्थाचालकांना हाताशी धरून शालार्थ आयडीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करीत शासनाच्याच तिजोरीवर डल्ला मारला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित चव्हाण पसार आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने यापूर्वीच चव्हाणचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. त्यामुळे चव्हाण याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असता, त्यावर सोमवारी (ता. ५) सुनावणी होऊन त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे चव्हाण यास मोठा दणका बसला असून, या साऱ्या कटाचा तोच सूत्रधार असल्याचे बोलले जाते. गेल्या दोन आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण कुवर, शिक्षण संस्थाचालक शरद शिंदे या दोघांचेही अटकपूर्व अर्ज फेटाळून लावले आहेत. या संशयितांविरोधात आता पोलिसांकडून फास आवळला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com