गरुड बंधूंच्या जामीनावरील सुनावणी २२ ला

गरुड बंधूंच्या जामीनावरील सुनावणी २२ ला
Published on: 
लोगो : शालार्थ आयडी घोटाळा गरुड बंधूंच्या जामीन सुनावणीला २२ तारखेपर्यंत मुदत गेल्या जुलैपासून नाशिक रोड कारागृहात न्यायालयीन कोठडी; सुनावणीला पुन्हा स्थगिती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेला शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष संजय गरुड आणि सहसचिव दीपक गरुड यांच्या जामीन अर्जांवरील सुनावणी २२ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. दोघेही गेल्या जुलैपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय गरुड याला २७ जुलैच्या रात्री सोलापूर जिल्ह्यातील फार्महाउसवरून नाशिक शहर गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर त्याचा भाऊ दीपक गरुड यालाही अटक करण्यात आली. दोघांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केले आहेत. सोमवारी (ता. १२) सुनावणी होणार होती, मात्र या वेळीही कामकाज होऊ शकले नाही. दरम्यान, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त सचिन बारी आणि संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकांकडून धुळे व जळगाव जिल्ह्यांतील शाळांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणातील तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळले. काही संशयित शिक्षणाधिकारी फरारी असून, गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com