Nashik Traffic Problem: शालिमार चौकाला रिक्षाचालकांचा विळखा! वाहतुकीला होतोय अडथळा

Even when rickshaw stands are planned, rickshaws parked by rickshaw pullers directly on the footpath without authorization
Even when rickshaw stands are planned, rickshaws parked by rickshaw pullers directly on the footpath without authorizationesakal

Nashik Traffic Problem : नेहमी गजबलेल्या शालिमार चौकाला बेशिस्त रिक्षाचालकांचा विळखाच पडला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीला अडथळा होऊन कोंडीची समस्या निर्माण होत असते.

शालिमार चौकात रिक्षाचालकांसाठी थांबे निश्‍चित केलेले असतानाही मुजोर चालक चौकात कुठेही प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षा थांबवितात. अशा रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने त्यांची मुजोरी वाढल्याचे दिसून येते. (Shalimar Chowk crowd of rickshaw drivers Traffic obstructed in city nashik news)

गेल्या काही महिन्यातील घटनांमध्ये रिक्षाचालकांकडून मारहाण, लूटमार, प्रवाशांना दमबाजी यासारख्या घटनांमध्ये वाढ झाल्या आहेत. शहर-परिसरामध्ये सुमारे २५ हजारांपेक्षाही अधिक रिक्षा रस्त्यावर धावतात.

रिक्षाचालकांसाठी महापालिकेने थांबे निश्‍चित करून दिले आहेत. परंतु रिक्षाचालक ते थांबे सोडून रिक्षा कुठेही लावतात. त्यामुळे शहरातील अनेक मध्यवर्ती चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते. त्यातून वादावादीचेही प्रकार घडतात.

अशा रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून मोहीम राबविण्याची मागणी होते आहे. रिक्षाचालकांनी ड्रेसकोड, परवाना, रिक्षाचा परवाना आणि वाहतूक नियमांचे पालन करीत प्रवासी वाहतूक करणे बंधनकारक आहे.

मात्र, बहुतांशी रिक्षाचालकांकडून नियमांचे उल्लंघन करीत वाहतूक पोलिसांनाच आव्हान देत असल्याचे चित्र आहे. बहुतांश रिक्षाचालक हे ड्रेसकोडचे उल्लंघन करतात.

शालिमार चौकात संदर्भ सेवा रुग्णालयासमोरील बसथांब्यावरच रिक्षाचालक प्रवासी घेण्यासाठी रिक्षा थांबवितात. त्यामुळे शहर बसला रस्त्याच्या मधोमध बस थांबवावी लागते. परिणामी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Even when rickshaw stands are planned, rickshaws parked by rickshaw pullers directly on the footpath without authorization
Nashik ZP News: जिल्हा परिषदेचा 94.13 टक्के निधी खर्च; अखर्चिक निधीचा हिशोब अद्यापही सुरूच

तर, गंजमाळकडून शालिमार चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावरही व्यावसायिकांच्या दुकानांसमोर मुजोर रिक्षाचालक रिक्षा थांबवितात. त्यामुळेही वाहतूक कोंडी होत असते. शालिमार चौकालगत रिक्षा थांबा असतानाही काही रिक्षाचालक हे मुजोरी करीत प्रवासी भरतात. त्यावरूनही रिक्षाचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग सतत घडत असतात.

वाहतूक पोलिस उदासीन

पूर्वी शालिमार चौकात वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती असायची. अलीकडे या चौकात वाहतूक पोलिसच नसतो. त्यामुळे सीबीएसकडून येणारे वाहनचालक वळसा घालून शालिमारकडे येण्याऐवजी टायटन शोरुमसमोरूनच वाहने चालवितात.

यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होते. अनेकदा तर अपघातही होतात. यात प्रामुख्याने दुचाकी व रिक्षाचालकांचा समावेश असून, त्यांच्यावर कारवाईसाठी वाहतूक पोलिसच नसल्याने त्यांचे फावते.

Even when rickshaw stands are planned, rickshaws parked by rickshaw pullers directly on the footpath without authorization
Helmet Special Drive : सावधान.. 2042 विना हेल्मेट चालकांवर दडुंका! वाहतूक पोलिस अलर्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com