पर्यावरणपूरक विज्ञान मॉडेल प्रदर्शनात शानभाग विद्यालय प्रथम

पर्यावरणपूरक विज्ञान मॉडेल प्रदर्शनात शानभाग विद्यालय प्रथम
Published on: 
NSK26H34274 जळगाव : पर्यावरणपूरक विज्ञान मॉडेल प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थिनी आर्या पाटील व क्रिष्णाली पाटील यांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक व शिक्षक. ------------- विज्ञान प्रदर्शनात शानभाग विद्यालय प्रथम -- आर्या, क्रिष्णालीच्या प्रकल्पांचा गौरव; २० मॉडेल्समध्ये पटकावला मान सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२ : आरोग्य भारतीतर्फे रविवारी (ता.१) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय पर्यावरण कार्यशाळेअंतर्गत झालेल्या विज्ञान मॉडेल प्रदर्शनात विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ब. गो. शानभाग विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. जिल्ह्यातील विविध विभागांतून सादर झालेल्या २० पर्यावरणविषयक विज्ञान मॉडेल्समध्ये विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रकल्पांना विशेष गौरविण्यात आले. विद्यालयाची विद्यार्थिनी आर्या योगेश पाटील हिने प्रकल्पातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शाश्वत शेतीची संकल्पना मांडली. आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी प्रभावी वापर करून पर्यावरणपूरक शेतीला चालना देण्याचा दृष्टिकोन या प्रकल्पातून स्पष्ट करण्यात आला. क्रिष्णाली पाटील हिने पृथ्वीचे संरक्षण, ऊर्जेची बचत व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यावरणाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासह नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्याचा संदेश तिने या मॉडेलद्वारे दिला. दोन्ही विद्यार्थिनींनी वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता व पर्यावरणविषयक जाणीव यांच्या बळावर प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या या कामगिरीमुळे विद्यालयाला प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले. या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, सकाळ विभागाच्या प्रमुख रुपाली पाटील, दुपार विभागप्रमुख स्वप्निल पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आर्या व क्रिष्णाली यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.