शंकरराव नगरात समस्यांचा विळखा; गटारी, गवत आणि अंधाराचे साम्राज्य

शंकरराव नगरात समस्यांचा विळखा; गटारी, गवत आणि अंधाराचे साम्राज्य
Published on: 
टुडे पान ३ : मेन फिचर लोगो नव्या वस्त्या, जुन्याच समस्या (१७ ऑक्टोबर टुडे सीटी पान ४ वरून हा लोगो घ्यावा) --- NSK26H32979 जळगाव : शंकरराव नगरातील कच्च्या गटारात तुंबलेले सांडपाणी. ------------ NSK26H32980 कच्चा रस्त्याची दुरवस्था. ----------- NSK26H32981 रस्त्याच्या मधोमध तुटलेला ढापा. ---------- NSK26H32983 रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा. --- शंकररावनगर परिसरात समस्यांचा विळखा अनेक भागांत कच्चे रस्ते; गटारी, गवत आणि अंधाराचे साम्राज्य सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२७ : शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना शंकरराव नगर परिसरालाही विविध समस्यांनी घेरले आहे. अनेक ठिकाणी गटारींची अस्वच्छता, मोकळ्या जागांमध्ये वाढलेले गवत, अपुऱ्या पथदीपांमुळे निर्माण होणारा अंधार आणि काही भागांतील कच्चे रस्ते यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढीव वस्त्यांमध्ये घरे वाढत असताना रस्ते, गटारी, पथदिवे आणि नियमित स्वच्छता या मूलभूत सुविधांची पूर्तता होणे आवश्यक आहे. मात्र, शंकरराव नगरातील काही भागांमध्ये या सुविधांचा अभाव जाणवत असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अस्वच्छतेची समस्या परिसरातील मोकळ्या जागा आणि रस्त्यांच्या कडेला गवत वाढल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे. काही ठिकाणी वाढलेल्या गवतामुळे परिसराचे स्वरूप बकाल दिसत असून, अशा जागांची नियमित साफसफाई होण्याची गरज आहे. गटारींचा प्रश्न ऐरणीवर गटारींची नियमित साफसफाई न झाल्यास सांडपाणी वाहण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे परिसरातील गटारींची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे. वाढीव वस्त्यांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन करताना लोकसंख्येचा आणि वाढत्या घरांचा विचार होणे गरजेचे आहे. पथदीप बंदच शंकरराव नगरातील काही भागांमध्ये पथदीपांची समस्या असल्याने रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश मिळण्याचा प्रश्न निर्माण होतो. अंधारामुळे पादचाऱ्यांना तसेच दुचाकीस्वारांना रस्त्यावरून ये-जा करताना अडचणी येऊ शकतात. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रात्री कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पथदीप सुरू असणे आवश्यक आहे. रहिवाशांची गैरसोय परिसरातील काही भागांमध्ये अद्याप पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कच्च्या रस्त्यांवर धूळ उडणे, खड्डे पडणे आणि पावसाळ्यात चिखल होणे यांसारख्या समस्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांनाही अशा रस्त्यांवरून प्रवास करताना काळजी घ्यावी लागते. चौकट ठोस कार्यवाहीची अपेक्षा वाढीव वस्त्यांचा विस्तार लक्षात घेता नागरी सुविधांचे नियोजन करणे ही महापालिकेसमोरील महत्त्वाची जबाबदारी आहे. शंकरराव नगरातील रस्ते, गटारी, पथदिवे आणि स्वच्छतेच्या समस्यांकडे एकत्रितपणे लक्ष देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com