मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही? शरद पवारांनी अखेर दिलं उत्तर | Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही? शरद पवारांनी दिलं उत्तर

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नाशिक : पंतप्रधान मोदींविरोधात (pm narendra modi) विरोधकांकडे चेहरा नसल्याच्या प्रश्नावर अखेर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी खास शैलीत थेट उत्तर दिलंय..यामुळे या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. काय म्हणाले शरद पवार...

मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही? शरद पवारांनी दिलं उत्तर....

शरद पवार आज रविवारी (दि. १४) आणि सोमवारी (दि. १५) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकार परिषदे दरम्यान ते बोलत होते. आगामी महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार नाशिक दौऱ्यावर असल्याने ते पदाधिकाऱ्यांशी या निवडणुकांबाबत गुफ्तगूदेखील करणार असल्याची चर्चा आहे. विरोधकांकडे मोदींसारखा चेहरा नसल्याच्या प्रश्वावर अखेर शरद पवार यांनी उत्तर दिलंय..

"पंतप्रधान मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नसल्याचं वारंवार सांगितलं जातं. त्यावर विरोधकांकडून कोणतंही उत्तर दिलं जात नाही. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला पूर्णविराम दिला आहे. विरोधकांकडे चेहरा नाही असं म्हणता येणार नाही, इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्याविरोधातही नेतृत्व नव्हतं. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या आणि नेतृत्व उभं राहिलं. त्यामुळे विरोधी पक्षाकडे चेहरा नाही असं म्हणता येणार नाही, असं पवार म्हणाले.

....म्हणून महाराष्ट्रात अस घडणं योग्य नाही

त्रिपुरा हिंसाचार प्रकरण घडलं म्हणून महाराष्ट्रात अस घडणं योग्य नाही. महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या. या प्रवृत्तींना किती महत्व द्यायचं हे लोकांनी ठरवावं. राज्य सरकार चांगलं काम करत असतांना बंदचा निर्णय नैराश्यातून सार्वजनिक शांततेला धक्का बसेल अस काम काही राजकीय पक्षांचे घटक करतायत, हे दुर्दैव आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. तीन चार राज्याच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं आहे. याचा फटका सामान्यानांच बसतो

हेही वाचा: ST महामंडळाच्या विलीनीकरणाची मागणी अयोग्य - अजित पवार

एसटी संपाबाबत शरद पवार म्हणाले...

तुम्ही जिथे आहात तिथे प्रश्न सोडवले पाहिजे. दुसरीकडे वर्ग करून प्रश्न सोडवा अस म्हणणे अयोग्य आहे. न्यायालयाने देखील या बाबत स्पष्ट भूमिका दिलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शक्य नाही, असं प्राथमिक दृष्ट्या तरी दिसतंय. कामगार संघटना आणि राज्यसरकारने एकत्र बसून यावर तोडगा काढावा. एकादशीला असंख्य लोक वारीला जाता आज त्यांचेही हाल आस्तेला धक्का बसविण्याच काम केलं जातंय

हेही वाचा: PHOTO : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

loading image
go to top