Sharad Pawar
sakal
नाशिक: मराठा व ओबीसी आरक्षणावरून राज्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघत असताना मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाशी आमचा कवडीचा संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांच्याशी आमचा संबंध नाही, त्यांच्याविषयी जास्त बोलणे योग्य नाही. मात्र, आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी मांडले.