Sharad Pawar on Onion Export Ban: रस्त्यावर येण्याची हौस नाही, पण रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही : शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawaresakal

चांदवड : केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी अस्वस्थ अन् उद्धवस्त झाला आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नसून, कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत असल्याचे पवारांनी म्हटले आहे.

त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे. आम्हाला रस्त्यावर येण्याची हौस नाही, पण रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीविरोधात चांदवड येथे शरद पवारांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी शरद पवार बोलत होते. (Sharad Pawar statement on Onion Export Ban appeal central government to withdraw ban at chandwad nashik)

सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतलेला असला तरी त्यांना तो निर्णय मागेच घ्यावा लागेल. जोपर्यंत सरकार निर्णय माघारी घेत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.

शरद पवार पुढे म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांची काळजी नसेल तर शेतकरी उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.. कुणी म्हणत असेल कांदा महाग झाला तर त्याने तो खाऊ नये.. ही बंदी उठवलीच पाहिजे.

आम्हाला रस्त्यावर बसण्याची हौस नाही. लोकांना त्रास द्यावा वाटत नाही. परंतु असं केल्याशिवाय दिल्लीला जाग येत नाही.

चांदवडच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर सरकारकडून असं करु, तसं करु सांगितलं जात आहे. याच्यापूर्वी कुणी काहीही बोलत नव्हतं. असं म्हणत शरद पवारांनी निर्णय मागे घेण्याचं आवाहन केलं.

शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत. कांदा उत्पादकांच्या हाती कमी पैसे पडतात याचा विचार सरकारने करायला हवा. गारपीट आणि अवकाळी मुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी. कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी. शेतकऱ्यांची ताकद काय आहे हे दाखवून द्या आणि हे नाशिक जिल्हा करूच शकतो.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उगीच राजकारण करु नये. उद्या आम्ही दिल्लीला जाणार आहोत तेव्हा अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहोत. सरकाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं.

देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद आहे सरकारच्या धोरणामुळे तुमच्या कष्टाला किंमत नाही. केंद्राला शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. नाशिक जिल्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लोकांच्या ताटात कांदा मिळतो त्यासाठी तुम्ही कष्ट करता. नाशिक हा शेतीसाठी महत्वाचा जिल्हा आहे. घाम गाळून काळ्या आईशी इमान राखण्याची भूमिका तुम्ही घेतली. देशाच्या नकाशावर नाशिकच्या शेतकऱ्यांची नोंद झाली आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड यांनी प्रास्ताविक करत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.

माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माजी आमदार अनिल कदम, माजी आमदार दिपिका चव्हाण, डॉ. डि.एल. कराड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड , श्रीराम शेटे, माणिकराव शिंदे यांचे भाषणं झाली.

यावेळी माजी आमदार उत्तम भालेराव, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव, विजय जाधव, पुरुषोत्तम कडलग, दत्तात्रय वाघचौरे,शिवाजी सोनवणे, शैलेश ठाकरे, पंकज दखणे, चंद्रभान उगले , अनिल पाटील, परशराम निकम, संदीप शिंदे, रीजवान घासी, खंडेराव आहेर, नवनाथ आहेर आदींसह हजारो शेतकरी उपस्थित होते.

Sharad Pawar
''जेव्हा भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालून सभागृहात आले होते...'' शरद पवारांनी सांगितला तेरा वर्षांपूर्वीचा किस्सा

माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांना अश्रू अनावर

निर्यातबंदी नंतर शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून आदल्या दिवशी चार हजार पाचशे रुपये विकणारा कांदा निर्यातबंदी नंतर दुसऱ्या दिवशी तेराशे विकला गेल्याचे सांगताना शेतकऱ्यांकडू आता पैसे नाहीत.

या सरकारकडून शेतकऱ्यांना सातत्याने नागवलं जात आहे. शेतमालाला कधी भाव मिळून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली की भाजपचे हे सरकार लगेच असे निर्णय घेते. यामुळे शेतकऱ्यांची झालेली अवस्था सांगताना माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांना अश्रू आवरता आले नाही.

शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

तेरा वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. रास्ता रोको आंदोलनादरम्यान बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद झालेली आहे.

२००९-२०१० मध्ये लोकसभेत भाजपच्या लोकांनी कांद्याच्या किंमती वाढल्या म्हणून गोंधळ घातला होता. भाजपचे लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून सभागृहात आले.

त्यांनी कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी केली होती.शरद पवार पुढे म्हणाले, लोकसभा अध्यक्षांनी मला सरकारच्या धोरणाबद्दल विचारलं.

मी उत्तर दिलं, कांदा पिकवणारा शेतकरी लहान शेतकरी आहे. थोड्याश्या किंमती वाढल्या तर एवढा दंगा करण्याची गरज नाही. तुमच्या सबंध ताटामध्ये कांद्याचा खर्च किती? यावर काहीही उत्तर आलं नाही. मी निर्णय घेतला कांद्याची किंमत कमी होणार नाही आणि निर्यातबंदी होणार नाही.

Sharad Pawar
नाशिक लोकसभा मतदारसंघ कुणाकडे? शरद पवारांच्या वक्तव्यामुळे महाआघाडीत मिठाचा खडा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com