Shasan Aplya Dari: किमान 10 लाख लाभार्थ्यांना मिळणार लाभ! पालकमंत्री दादा भुसे

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांसंदर्भात आढावा बैठक
dada bhuse
dada bhuseesakal
Updated on

Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आठ लाख ९१ हजार ३४० पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ देण्यात आला. किमान १० लाख लाभार्थी होणे अपेक्षित आहे.

‘शासन आपल्या दारी’ योजनेची माहिती ग्रामस्थांना व्हावी, यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत शासकीय अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ द्यावा, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी आजच्या आढावा बैठकीत दिले.

येत्या शनिवारी (ता. १५) गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होत असून, त्या पार्श्‍वभूमीवर मैदानावर सुरू असलेल्या कामकाजाची पाहणीही पालकमंत्री भुसे यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केली. (Shasan Aplya Dari At least 10 lakh beneficiaries will get benefits Guardian Minister Dada Bhuse nashik)

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा पालकमंत्री भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेतला. या वेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार अॅड. राहुल ढिकले, सीमा हिरे, दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब पारधे, माया पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे म्हणाले, की ‘शासन आपल्या दारी’साठी असलेल्या लाभार्थ्यांना एस. टी. महामंडळाच्या बसच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी आणले जाणार आहे. या लाभार्थ्यांना आणणे व परत पोचही केले जाणार असल्याने त्यासंदर्भात स्वतंत्र समन्वय कक्ष स्थापन करावा.

त्याचप्रमाणे, ज्या पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांमुळे लाभ झाला, त्यांचे अनुभव कथन करणाऱ्या चित्रफिती तयार करून त्या कार्यक्रमस्थळी दाखविण्यात याव्यात. तसेच, सिन्नर, सुरगाणा, नांदगाव, देवळा, येवला, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे तालुके ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत लाभार्थींचा लाभ घेण्यात मागे आहेत.

यासाठी उर्वरित दिवसांत अधिकाऱ्यांनी शिबिरे घेऊन लाभार्थ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा, असे सांगत या उपक्रमांतर्गत आठ लाख ९१ हजार ३४० पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ झाला आहे.

मात्र, किमान १० लाख लाभार्थ्यांनी लाभ घेणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. या बैठकीनंतर पालकमंत्री भुसे यांनी डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेल्या कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

dada bhuse
Shasan Aplya Dari : जिल्हा परिषदेचे अधिकारी पोहचले 2 लाख लाभार्थ्यांपर्यंत! ‘शासन आपल्या दारी’ विशेष मोहीम

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी कार्यक्रमासाठी तयार करण्यात येणारी मंडप व्यवस्था, विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स, लाभार्थ्यांच्या आसन व्यवस्था याबाबत चर्चा केली.

पावसाची शक्यता...

सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे. कार्यक्रमाच्या दिवशीही पाऊस असण्याची शक्यता गृहित धरून त्या दृष्टिकोनातून मैदानातील सभामंडपांची रचना करण्यात आलेली आहे.

मैदानावर चिखल होणार नाही, मंडपातून पाणी येणार नाही याची दखल घेण्यात आल्याचे व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीची व्यवस्था करण्यात आल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, तालुक्यातून लाभार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसची पार्किंग ईदगाह मैदानावर केली जाणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.

"‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी त्या दिवशी करण्यात येणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येतील. या बदलामुळे नाशिककरांना काहीसा त्रासही होण्याची शक्यता आहे. परंतु, नाशिककरांनी सदरचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य करावे."

- दादा भुसे, पालकमंत्री

dada bhuse
Nashik Political News: राज्यपाल नियुक्त आमदारासाठी भाजप, NCPच्या नेत्यांची चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com