फोटो -NSK26H32091
नाशिक : शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित व्याख्यानास उपस्थित विद्यार्थी.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना
‘शताब्दी’त उद्योजकतेचे धडे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नवकल्पना आणि उद्योजकतेच्या संधींची ओळख व्हावी, यासाठी शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्राइजच्या सहकार्याने ‘एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीज’अंतर्गत व्याख्याने घेण्यात आली.
मंगळवारी (ता.६) सनफेस इनोव्हेशन्सचे संचालक आशिष देशमुख यांनी सौरऊर्जा क्षेत्रातील करिअर व व्यवसायाच्या संधींविषयी मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या पलीकडे जाऊन सौरऊर्जा व नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रातील संधींचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले. ७ ऑक्टोबरला पॉवर होइस्ट अँड क्रेनचे संचालक अँड्रयू कॅन्डे यांनी अभियांत्रिकीतील कल्पना प्रत्यक्ष उत्पादन व व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी तांत्रिक ज्ञानासोबत उद्योजकीय दृष्टिकोन, सातत्य आणि धाडस आवश्यक असल्याचे सांगितले. कॅन्डे हे संस्थेचे २०१६ मधील यांत्रिकी अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी असून, आंतरराष्ट्रीय एमएमए स्पर्धांमध्ये खेळाडू व तांत्रिक अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रीतम वीर व डॉ. स्नेहा वीर, स्टार्टअप अँड इनोव्हेशन सेलच्या अध्यक्षा शताब्दी वीर, कॅम्पस संचालक डॉ. सी. के. पाटील, प्राचार्य डॉ. संजय बागुल, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. गोखुल महाजन यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.