सप्तशृंग गडावर भाविकांसाठी निवारा शेड आमदार चित्रा वाघ यांच्याकडून पाहणी; सुविधांसाठी आणखी निधी देण्याची तयारी

सप्तशृंग गडावर भाविकांसाठी निवारा शेड आमदार चित्रा वाघ यांच्याकडून पाहणी; सुविधांसाठी आणखी निधी देण्याची तयारी
Published on: 
मेन शेजारी घेणे 13374 सप्तशृंगगड : परतीच्या पायरी परिसरात बांधलेल्या निवारा शेडची पाहणी करताना आमदार चित्रा वाघ. शेजारी रमेश पवार, संदीप बेनके, धनेश गायकवाड, भाऊ निमकर आदी. गडावर भाविकांसाठी निवारा शेड आमदार चित्रा वाघ यांच्याकडून पाहणी वणी, ता. २७ : सप्तशृंगगडावर भाविकांच्या सोयीसाठी आमदार चित्रा वाघ यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या निवारा शेडची त्यांनी पाहणी केली. या वेळी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गडावरील भाविकांच्या सुविधांचा आढावा घेतला. भविष्यातही भाविकांच्या सोयींसाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. आमदार वाघ यांनी गडावरील उतरत्या पायऱ्यांजवळ उभारण्यात आलेल्या निवारा शेडची पाहणी केली. भाविकांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने हे शेड बांधण्यात आले आहे. अनेक भाविक अनवाणी पायऱ्या उतरून आल्यानंतर परिसरात प्रसाद, बांगड्या व अन्य वस्तूंची खरेदी करतात. या वेळी उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत असल्याने निवारा शेडची मागणी होत होती. भाविक, पुजारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार वाघ यांनी गडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. भाविकांच्या सुविधांसाठी भविष्यात आणखी कामांची आवश्यकता भासल्यास त्यासाठी आमदार निधीतून मदत करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, गडावरील महिला वैशाली बनकर, जयाबाई केदारे, केदाबाई महाले आदींनी आमदार वाघ यांचे स्वागत केले. तसेच निवारा शेड उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. .......... कोट दर्शनासाठी येणारे अनेक भाविक अनवाणी उतरून येतात. त्यानंतर उन्हात उभे राहून खरेदी करताना त्यांना त्रास होतो. त्यामुळे निवारा शेडची मागणी आमदार चित्रा वाघ यांच्याकडे केली होती. त्यांनी आमदार निधीतून २० लाख रुपये उपलब्ध करून दिले. संदीप बेनके, माजी उपसरपंच, सप्तशृंगगड ............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com