शेंदवडच्या डोंगररांगांत बहरतोय रानमेव्याचा खजिना!

शेंदवडच्या डोंगररांगांत बहरतोय रानमेव्याचा खजिना!
Published on: 
(पान ४ ला ॲंकर) WRS26B02905, WRS26B02906 शेंदवड : भवानी डोंगर परिसरातील जंगलात नैसर्गिकरीत्या बहरणारा विविध प्रकारचा रानमेवा आणि पावसाळ्यात आढळणारी ‘मेका’ व ‘मेका’ची वैशिष्ट्यपूर्ण रानवेल. --------- शेंदवडच्या डोंगररांगांत बहरतोय रानमेव्याचा खजिना! करवंद, तोरण, मोह, जांभळांसह ‘मेका’ या वैशिष्ट्यपूर्ण रानफळाची चव भिलाजी जिरे : सकाळ वृत्तसेवा वार्सा, ता. ८ : शेंदवड (ता. साक्री) येथील सातपुड्याच्या सह्याद्रीलगतच्या डोंगररांगांमध्ये वसलेला शेंदवड भवानी गड परिसर निसर्गसंपत्ती आणि जैवविविधतेने समृद्ध आहे. घनदाट जंगल, डोंगरदऱ्या, नैसर्गिक जलस्रोत आणि वनौषधींच्या सान्निध्यात येथे विविध प्रकारचा रानमेवा नैसर्गिकरीत्या बहरतो. मेका, करवंद, तोरण, मोह, जांभूळ, आवळा अशा रानफळांसोबतच पावसाळ्यात आढळणारी ‘मेका’ची वैशिष्ट्यपूर्ण रानवेल परिसराचे वेगळेपण अधोरेखित करते. शेंदवड भवानी डोंगर, वखारदरा वन पर्यटन क्षेत्र आणि परिसरातील जंगलांमध्ये स्थानिक आदिवासी बांधवांना पिढ्यान्‌पिढ्या परिचित असलेल्या अनेक रानफळांची रेलचेल असते. उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला करवंदाच्या काळ्याभोर, आंबट-गोड फळांनी डोंगरावरील झुडपे लगडतात. काटेरी झुडपांवर येणारी गोडसर तोरणे, मोहाची फुले व फळे, तसेच नैसर्गिक जलस्रोतांच्या परिसरातील रसाळ जांभळे हा येथील रानमेव्याचा ठेवा आहे. याशिवाय आवळा तसेच वनौषधींचाही जंगलात आढळत आहे. ‘मेका’ची आंबट-गोड चव विशेष आकर्षण या परिसरातील पावसाळी रानमेव्यामध्ये ‘मेका’ किंवा ‘मेखा’ या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीचे विशेष आकर्षण आहे. आकाराने लहान असणारी ही फळे सुरुवातीला बारीक केसाळ आवरणाने झाकलेली असतात. पक्व झाल्यानंतर त्यावरील लव कमी होते. आंबट-गोड चवीमुळे ही फळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडतात. ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना या वनस्पतीची ओळख असून, पावसाळ्यात जंगलात फिरताना या रानमेव्याचा आस्वाद घेतला जातो. रानमेवा म्हणजे आदिवासींच्या उपजीविकेचा आधार शेंदवड, चिवटीबारी, कोंडाईबारी आणि परिसरातील आदिवासी बांधव जंगलातून हंगामानुसार रानमेवा गोळा करतात. त्यातील काही भाग स्वतःच्या आहारासाठी वापरला जातो, तर उर्वरित रानमेवा पायथ्याशी तसेच साक्री-पिंपळनेर रस्त्यालगत विक्रीसाठी आणला जातो. त्यामुळे जंगलातील नैसर्गिक संपत्ती ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेलाही हातभार लावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.