धुळे : टुडे पान ४ साठी..
--
शेणपूर, मलांजन बंधाऱ्याचे काम पूर्ण करा
--
स्थानिकांची मागणी : कामाला देयकांअभावी ब्रेक
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. २२ : शेणपूर आणि मलांजन (ता. साक्री) येथील पांझरा नदीवर मंजूर झालेल्या के.टी.वेअर बंधाऱ्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सागर काकुस्ते, गणेश काकुस्ते यांनी हे निवेदन दिले.
-
सदर बंधाऱ्याचे काम मंजूर होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला असून आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित काम ठप्प आहे. संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता कामाचे एमबी रेकॉर्ड होऊन एक वर्ष उलटले तरी पहिल्या देयकाची रक्कम मिळाली नसल्याने काम बंद ठेवल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने शेणपूर आणि मलांजन ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हा बंधारा पूर्ण झाल्यास परिसरातील पाणीसाठा वाढून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना द्याव्यात आणि अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.