Nashik News : मेंढपाळांना लागली गावाकडची ओढ! खरीप हंगाम संपल्यावर पुन्हा बाहेरगावी

A shepherd with his sheep on his way to his native village
A shepherd with his sheep on his way to his native villageesakal

नरकोळ (जि. नाशिक) : दिवाळीपूर्वी मेंढ्या चारण्यासाठी गेलेले मेंढपाळ आपल्या मुळ गावी परतू लागले आहेत. कसमादे भागातील मेंढपाळ हजारो मेंढ्या घेऊन गेल्या सात महिन्यापासून निफाड, नाशिक, सिन्नर आदी भागात गेले होते. या भागात दिवाळी हंगामात टोमॅटो काढणीनंतर शेत मोकळे होतात.

खरीप हंगामातील शेतात बाजरी, तृणधान्ये काढणीनंतर चारा उपलब्ध होतो. त्या चाऱ्यावर मेंढ्यांची गुजरण होते. आता ही कामे उरकल्याने मेंढपाळ आता मुळ गावी येत आहेत.

उन्हाळ्यातील सण समारंभाचे दोन महिने व खरीप हंगामाचे पीक घेतल्यानंतर ते पुन्हा बाहेरगावी जातील. यामुळे खरीप हंगामानंतरच गावोगावी मेंढ्यांचे वाडे दिसतील.

(shepherds drawn to village After end of Kharif season village should come out again Nashik News)

कसमादे पट्ट्यात उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. उन्हाळी कांदा काढणीस सुरवात झाली आहे. काढणीनंतर कांद्याची पात चारा म्हणून मेंढ्यांना उपयोगी येते.

कांद्याच्या पातीवर दोन महिने सहज निघून जातात. शेतात मेंढ्या बसविल्यानंतर त्यांच्या लेंड्यांचा खत म्हणून वापर केला जातो. अनेक शेतकरी खताच्या मोबदल्यात आपापल्या शेतात मेंढ्या बसविण्यास संमती देतात. (Latest Marathi News)

उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्यात मिळेल तेथे मोकळ्या जागेत रस्त्याच्या कड्यांना मेंढ्या चरत असतात. बहुतांश वनस्पतींना पाला असतो. आता मेंढपाळ बांधवांना मुळ गावाची ओढ लागली आहे. त्यामुळे महामार्गावरून मेंढरांचे कळप गावाकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

A shepherd with his sheep on his way to his native village
SAKAL Impact : आंदोलनाचा ईशारा देताच नळपाणी पुरवठा योजना सुरु

मेंढ्यांसोबत मेंढपाळही आपला कुटुंबकबिला घोड्यांच्या पाठीवर ठेवून गावी येत आहेत. पाऊस उशिरा पडला किंवा पावसाने दडी मारली तर मेंढपाळांचा मुक्काम वाढत असतो. यंदा मात्र ते वेळेआधीच मार्गस्थ होताना दिसत आहेत.

"मेंढपाळ हा आमचा पारंपारिक व्यवसाय आहे. पूर्वीपेक्षा आता अडचणींनी अधिक तोंड द्यावे लागते. काही भागात शेतकरी स्वतःहून शेत चाचणीसाठी सांगतात. परंतु काही ठिकाणी शेताच्या बांधाला देखील स्पर्श करू दिला जात नाही. मेंढपाळ व्यवसाय खूपच जिकरीचा झाला आहे."

- मुन्ना माळी, ढोलबारे, ता. बागलाण

A shepherd with his sheep on his way to his native village
Nashik News: बिलोंड्या, सातपायऱ्याच्या डोंगररांगांना आग; बागलाण तालुक्यातील 15 हेक्टर वनक्षेत्र खाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com