लोगो : मार्केट अपडेट्स (दोन कॉलम फोटोसह)
NSK26H33210
जळगाव : डॉ. श्रीराज व डॉ. सुभा महाजन यांच्या शिल्प व खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे उद्घाटन करताना मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व मान्यवर.
-----
शिल्प, खानदेश प्लॅटिनम
हॉस्पिटलचे थाटात उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २१ : शहरातील प्रसिद्ध शिल्प हॉस्पिटल व खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटल या दोन्हींचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री एकनाथ खडसे, विधान परिषदेचे आमदार नंदकुमार महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, महापौर दीपमाला काळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. ए.जी. भंगाळे, सुनील भंगाळे , जामनेरचे नगरसेवक जितेंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बऱ्हाटे उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील, आदी उपस्थित होते.
शिल्प हॉस्पिटलमध्ये अपघात, जळीत रुग्ण, हाडांचे टेंडर व रक्तवाहिन्या तुटणे, जन्मजात व्यंग, जखम व कॅन्सर, हेअर ट्रान्सप्लांट, कॉस्मेटिक सर्जरी, स्तनांच्या कॉस्मेटिक सर्जरी, आदींची सुविधा उपलब्ध आहे. खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ट्रॉमा, क्रिटिकल केअर, कार्डियाक केअर, सुपरस्पेशालिटी विभाग आहेत. हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीराज महाजन व डॉ. सुभा महाजन यांनी यांनी सर्वांचे स्वागत केले.
---------