Nashik Politics : शिंदे सेनेत प्रवेश निधीची लॉटरी! भाजपमध्ये असंतोषाचा सूर
BJP Fumes as Party Members Are Denied Development Funds : शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना सरकारकडून विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याने, भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
नाशिक- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून शिंदे सेनेत प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांना विकासकामांसाठी निधीची लॉटरी लागली आहे. पक्षातील पाच माजी नगरसेवकांना २० कोटी ५५ लाख रुपयांच्या निधी शासनाने मंजूर केला आहे.