दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीची स्वच्छता

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर  स्मशानभूमीची स्वच्छता
Published on: 
SKD26B04391 शिंदखेडा : स्मशानभूमीची स्वच्छता करताना रोटरी क्लबचे सदस्य व शिंदखेडा नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी. -------- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीची स्वच्छता शिंदखेडा नगरपंचायत व रोटरी क्लबचा पुढाकार सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. ४ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी शहराच्या संकल्पनेतून शिंदखेडा नगरपंचायत व रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने कुमरेज रोड येथील स्मशानभूमी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रोटरी क्लब ऑफ शिंदखेडाचे अध्यक्ष डॉ. उमेशचंद्र सोनवणे यांच्या उपस्थितीत मोहीम पार पडली. मोहिमेदरम्यान स्मशानभूमी परिसरातील कचरा, झाडाझुडपे व अनावश्यक वस्तू हटवून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे व नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या वेळी आरोग्य निरीक्षक जितेंद्र अहिरे, शहर समन्वयक रवींद्र पाटील, मुकादम दिलीप पाटोळे, शकील मेहतर, हुसेन शेख यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते. रोटरी क्लबचे सचिव हुसेन शमशी, चेअरमन राकेश परदेशी, सदस्य अमरदीप गिरासे, बाळकृष्ण बोरसे, ॲड. हर्षल अहिरराव, सुमित जैन, राकेश परदेशी, मिलिंद निकम, अमित अमृतकर, स्वप्नील मोरे, सुधीर शिंपी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.