अवैध वाळू वाहतुक कारवाई

अवैध वाळू वाहतुक कारवाई
Published on: 
धुळे टुडे १ साठी... --- फोटो-NSK26H32913 शिंदखेडा : कारवाईत पकडलेल्या अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनांसह महसुलचे अधिकारी-कर्मचारी, पोलिसपाटील. --- अवैध वाळू वाहतुकीविरोधात संयुक्त पथकाचा जागता पहारा --- शिंदखेडा तालुक्यात कारवाई; ट्रॅक्टर जप्त सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ : शिंदखेडा तालुक्यात विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर महसूल यंत्रणा आणि गौण खनिज पथक ॲक्शन मोडवर आले आहे. अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस पाटलांच्या संयुक्त पथकाने रात्रभर पहारा देत पहाटे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडक कारवाई केली. शिंदखेडा तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक तसेच सर्व पोलिस पाटलांची शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी साडेपाचला संयुक्त बैठक झाली. या बैठकीत विनापरवाना वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. त्यानुसार शिंदखेडा मंडळातील मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि पोलिसपाटील यांनी बुराई नदीपात्रात रात्रभर जागता पहारा दिला. पथकाने पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर धाडसी कारवाई केली. तसेच, चिरणे रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून शिंदखेडा पोलिस ठाण्यात जमा केले. अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महसूल विभागाने दाखविलेली तत्परता आणि रात्रभर जागता पहारा देऊन केलेली कारवाई कौतुकास्पद असल्याचे मत उपविभागीय अधिकारी ( शिरपूर भाग) शरद मंडलिक यांनी व्यक्त केले. या कारवाईत शिंदखेडा मंडळाचे मंडळ अधिकारी मोहन पगार, ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र चव्हाण तसेच, मंडळातील महसूल सेवक आणि पोलिसपाटील यांनी बजावलेल्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले. यापुढेही अवैध वाळू वाहतूक आणि गौण खनिजाच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात अशीच कारवाई सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com