पान चार दोन कॉलम
-----------------
शिंदखेडा नगरपंचायतीच्या
रोजंदारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
-------
मासिक वेतनात तीन हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा ता.५ : नगरपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या ३२ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात प्रति कर्मचारी तीन हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली.
शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, विद्युत व्यवस्था तसेच विविध नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी हे रोजंदारी कर्मचारी सातत्याने योगदान देत असतात. ऊन, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीतही शहराच्या सेवेसाठी तत्पर राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत नगरपंचायतीने हा सकारात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नगरपंचायतीवर एकूण ९६ हजार रुपये प्रतिमाह अतिरिक्त आर्थिक भार येणार आहे. म्हणजेच वार्षिक ११ लाख ५२ हजार रुपयांची अतिरिक्त तरतूद आवश्यक राहणार आहे.
सदर सर्वसाधारण सभेस नगराध्यक्षा श्रीमती कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, सर्व नगरसेवक व नगरसेविका, प्रशासकीय अधिकारी शसचिन वाघ, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे तसेच वरिष्ठ लिपिक विवेक डांगरीकर उपस्थित होते. रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून त्यांच्या श्रमाचा सन्मान करणारा शिंदखेडा नगरपंचायतीचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची आनंदाची भेट ठरला आहे.