SKD26B04338
शिंदखेडा : पुणे येथे नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, भूषण वानखेडे, चिवीत जगदेव, रमेश भामरे.
-------------
शिंदखेड्यातील विद्यार्थी
नोकरीसाठी पुण्याला रवाना
शिंदखेडा, ता. ८ : येथील श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कै. शं. दे. पाटील उर्फ बाबूराव दादा साहित्य, वाणिज्य आणि कै. भाऊसाहेब म. दि. सिसोदे विज्ञान महाविद्यालय, आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. परिसरातील युवक- युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या. मेळाव्याला ३५९ विद्यार्थी उपस्थित होते. यात निवड झालेले विद्यार्थी नोकरीसाठी पुण्याला रवाना झाले.
या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल १५६ विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त झाली. त्यात बी. कॉम आणि बी. एस्सी या शाखेतील दहा विद्यार्थ्यांची पहिली टीम पुणे येथील टाटा गोशन या नामांकित कंपनीत डाटा ऑपरेटर या पदासाठी निवड झाली. त्यांना दरमहा १९००० पेक्षा अधिक वेतन मिळणार आहे. त्यात महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांचीही समावेश आहे. त्यांना दरमहा २२,५०९ पेक्षा अधिक वेतन मिळणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कंपनीच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे.
महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रफुलकुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, संचालक सुरेश देसले, प्राचार्य डॉ. आशुतोष पाटील, उपप्राचार्य डॉ. संजय बोरसे, उपप्राचार्य डॉ. विशाल पवार, प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, उपप्राचार्य सुवर्णसिंह राऊळ, कार्यालयीन अधीक्षक राहुल पाटील, आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रमचे प्रमुख भूषण वानखेडे, चिवीत जगदेव यांचे सहकार्य लाभले.