शिंदखेडा शिक्षक संघाच्या
अध्यक्षपदी ए. टी. पाटील
सचिवपदी दीपक जाधव यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. ३१ : शिंदखेडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची द्विवार्षिक निवडणूक नुकतीच जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ए. टी. पाटील, तर सचिवपदी दीपक मोतीलाल जाधव यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. के. जाधव होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माजी जिल्हा सचिव विश्वास एन. पगार, सहनिवडणूक अधिकारी वसंतराव गवळे आणि माजी तालुकाध्यक्ष एन. ए. भामरे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. या वेळी नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी ए. टी. पाटील, उपाध्यक्षपदी सुधाकर पाटील, वीरेंद्र पवार, जोस्ना सिसोदे, कार्यवाह दीपक जाधव, सहकार्यवाह संदीप बडगुजर, नीलिमा देसले, कोशाध्यक्ष प्रदीप कचवे, पदसिद्ध सदस्यपदी नरेंद्र भामरे, विजय जाधव, सदस्यपदी संजय महाले, नितीन पाटील, प्रवीण पाटील, राहुल पाटील, कुंदन पाटील, प्रशांत पाटील, कुणाल पाटील, नितीन पाटील, सूरज पवार, भास्कर पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. ए. टी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बी. जे. पाटील यांनी आभार मानले. विभागीय अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष किशोर बोरसे, कार्यवाह एम. बी. मोरे, राजेंद्र भदाणे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.