पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते वाहनाचे लोकार्पण

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते वाहनाचे लोकार्पण
Published on: 
(पान ४ ला मेन) SKD26B04313 शिंदखेडा : डिस्लजिंग व्हेईकल वाहनाचे लोकार्पण करताना मंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्ष कलावती माळी, अनिल वानखेडे व नगरसेवक. -------- शिंदखेडा नगरपंचायतीला मिळाले मैला उपसा वाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते वाहनाचे लोकार्पण सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. ३ : शहरातील स्वच्छता आणि मलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शिंदखेडा नगरपंचायतीला ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत मैला उपसा वाहन (डिस्लजिंग व्हेईकल) प्राप्त झाले आहे. या वाहनाचे लोकार्पण बुधवारी (ता. ३०) राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. या वाहनामुळे शहरातील सेप्टिक टँक आणि शौचालयांतील मैला उपशाची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत शिंदखेडा शहराचा स्वच्छता कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यात पाच एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारणे आणि मैला व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या निधीतून नगरपंचायतीला हे मैला उपसा वाहन उपलब्ध झाले आहे. या वाहनाची एकूण क्षमता तीन हजार लिटर असून, त्यात अडीच हजार लिटर मैला उपसा करण्याची, तर ५०० लिटर स्वच्छ पाणी साठविण्याची क्षमता आहे. शहरातील सेप्टिक टँक व शौचालयांमधील साचलेला मैला सुरक्षितपणे उपसा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी या वाहनाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोकार्पणप्रसंगी नगराध्यक्षा कलावती माळी, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, तहसीलदार नितीनकुमार देवरे, उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेत्या वंदना गिरासे, बांधकाम सभापती मनोहर पाटील, पाणीपुरवठा सभापती पूनम मराठे, आरोग्य सभापती संगीता भिल, महिला सभापती आरिफाबी कुरेशी यांच्यासह नगरसेवक सुयोग भदाणे, ज्ञानेश्वर सकट, शीतल सोनवणे, अर्जुन भिल, पुष्पा सोनवणे, अश्विनी राजपूत, कमलबाई पाटोळे, सुनीता देसले, दीपक देसले, रजूबाई माळी, अनिल वानखेडे व दीपक माळी उपस्थित होते. ---------- स्वच्छता व्यवस्थेला बळकटी मिळणार नगरपंचायतीच्या वतीने शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांना आवश्यक सेवा प्रभावीपणे पुरविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या वाहनामुळे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे, आरोग्य निरीक्षक जितेंद्र अहिरे, लेखापाल दीपलेश बागूल, लेखापरीक्षक शीतल भोज, शहर समन्वयक रवींद्र पाटील यांच्यासह नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com