नाशिक: ओझर विमानतळासह शिर्डी विमानतळालाही नागरी उड्डाण मंत्रालयाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असून, नाशिकच्या हवाई कनेक्टिव्हिटीसाठी लवकरच महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (ता.११) दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ११ वर्षपूर्तीनिमित्त नाशिक येथील भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. मोहोळ बोलत होते.