नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी राजपत्र प्रसिध्दीची तयारी उपविभागीय कार्यालयाचे पत्र व्हायरल (सुधारीत बातमी)

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी राजपत्र प्रसिध्दीची तयारी  उपविभागीय कार्यालयाचे पत्र व्हायरल  (सुधारीत बातमी)
Published on: 
पान-१ -------------- शिर्डीमार्गे पुणे रेल्वेमार्गाबाबत हालचाली गतिमान ---------------- प्रशासनाकडून बाधित गटांची माहिती रेल्वेकडे, जुन्या मागणीचे काय ? ------------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१६ ः नाशिक- पुणे (सरळ) रेल्वे मार्गासाठी एकीकडे आंदोलन सुरु असताना दुसरीकडे शिर्डीमार्गे रेल्वे मंजुरीनंतर बाधित होणाऱ्या क्षेत्राची गटनिहाय माहिती रेल्वे विभागाच्या उपअभियंत्यांना देण्यात आली. रेल्वेने मागितल्यानुसार निफाड उपविभागीय कार्यालयाने ही माहिती दिल्याचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली. ------- तालुक्यातील सिन्नर शहरासह, पांगरी खुर्द व पांगरी बुद्रूक या दोन गावांतील बाधित गटांची शेतकऱ्यांच्या नावांसहित माहिती देण्यात आली आहे. सिन्नर येथील २१ हेक्टर, पांगरी बुद्रूक येथील १७.३ हेक्टर तर पांगरी खुर्द येथील ११.७ हेक्टर प्रकल्पात जाणार आहे. भूसंपादन प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे यांच्या स्वाक्षरीसह मध्य रेल्वे विभागाच्या अहिल्यानगर येथील निर्माण उपअभियंत्यास पाठवण्यात आले आहे. नाशिकरोड- साईनगर-शिर्डी दुहेरी रेल्वेमार्गासाठी अधिसूचना भारत राजपत्रात प्रसिद्ध होण्याबाबत हे पत्र दिले आहे. नाशिक- पुणे रेल्वे मार्ग जुन्या मार्गानेच सिन्नर- संगमनेर- आळेफाटा- नारायणगाव- चाकण मार्गे होण्यासाठी आंदोलने झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे प्रकल्पाचा खोडद (आंबेगाव) येथील जागतिक दर्जाच्या खगोलशास्त्रीय दुर्बिणीवर होणारा संभाव्य परिणाम तपासण्यासाठी व त्यावर तांत्रिक तोडगा काढण्यासाठी समिती नेमली आहे. या समितीची ६० दिवसाची मुदत संपली असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. समितीने जनसुनावणी घेतली नसल्याबाबतही नाराजी असतानाच व आमदार सत्यजित तांबे यांनी द्रुतगती महामार्ग रोखण्याचा इशारा दिला असतानाच राजपत्र प्रसिद्ध करण्याची तयारी सरकारी पातळीवर सुरु असल्याचे या पत्रावरून दिसत आहे. त्यामुळे एकीकडे आंदोलन तर दुसरीकडे शिर्डी मार्गे रेल्वे प्रकल्पाची सुरु असलेली तयारी याबाबत तालुक्यात चांगलीच चर्चा होत आहे. १६-१ शिर्डीमार्गे प्रकल्पाला विरोध तालुक्यातून शिर्डीमार्गे रेल्वे प्रकल्प होण्यास विरोध आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गही अडविण्यात आला होता. शेतकरी, विद्यार्थी, उद्योजकांकडून प्रकल्प सरळ मार्गानेच संगमनेरमार्गे करण्याची मागणी आहे. तर डॉ. अनिल काकोडकर समितीच्या अहवालाचीही प्रतीक्षा आहे. असे असतानाच राजपत्र प्रसिद्धीसाठी देण्यात आलेली संपादीत करावयाच्या क्षेत्राची माहिती प्रशासकीय कामकाजाचा भाग असला तरी या पत्राने शासकीय पातळीवरची तयारी दिसून येत आहे. ---------------- कोट मध्य रेल्वेने मागितलेल्या माहितीनुसार त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. राजपत्रात प्रसिद्ध होणे अजून बाकी आहे. केवळ त्यांच्या मागणीनुसार प्रस्तावानुसार आपण माहिती कळविली आहे. - शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी, निफाड. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com