शिरपूर : क्रिकेट लीग बातमी

शिरपूर : क्रिकेट लीग बातमी
Published on: 
SHC26B13565 शिरपूर : एससीएल-६ च्या संघ लिलावप्रसंगी उपस्थित पदाधिकारी. ------- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार निधी शिरपूर क्रिकेट लीगचा खेळाडूंकडून संकल्प सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २ : येथील शिरपूर क्रिकेट लीग स्पर्धेच्या सहाव्या हंगामाला पाच नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार असून, यंदाच्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन हंगामातील एकूण उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत स्वरुपात दिली जाणार आहे. स्पर्धेतील संघाच्या लिलाव प्रसंगी संघ मालक आणि खेळाडूंनी हा संकल्प व्यक्त केला. किसान विद्या प्रसारक संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या संकल्पनेतून शिरपूर क्रिकेट लीग स्पर्धा भरविण्यात येते. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे. या हंगामात दहा संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी २०२ खेळाडूंनी नोंदणी केली. त्यांची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. कर्मवीर क्रिकेट संघ, वरवाडे फ्रीडम फायटर संघ, जय मातादी क्रिकेट संघ, राज-बी संघ, श्री स्वराज संघ, गॅलेक्सी वॉरियर्स संघ, भाग्य इलेव्हन संघ, चंदन आबा फाउंडेशन संघ, महर्षी वाल्मिकी संघ आणि अली ॲन्ड अबुजर स्ट्रायकर्स संघ अशा संघात सामने खेळवण्यात येणार आहेत. एससीएल समितीचे अध्यक्ष शशांक रंधे, सुदाम माळी यांच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. वासुदेव देवरे, चंद्रकांत पाटील, निलेश पाटील, पिंटू माळी, वारीस सय्यद, उज्वल राजपूत, भरत पाटील, योगेश राजपूत, डॉ. गणेश पाटील, श्रीकांत चव्हाण, सागर चौधरी, सुनील चौधरी, हेमराज पाटील, दिनेश कोळी, हंसराज पाटील, तोकिर तेली, सद्दाम लोहार आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या एकूण उत्पन्नातून दहा टक्के निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. एससीएल- ६ च्या हंगामात टेनिस बॉलवर सामने पार पडणार आहेत. कार्यकारी अध्यक्ष राकेश बोरसे, सचिव महमूद खाटीक, राहुल स्वर्गे, राजेंद्र पाटील, नूर तेली, दीपक पवार, भरत मराठे, सागर कोळी, कल्पेश माळी, विनोद सोनवणे, राकेश महाजन, सचिन बोरसे, सचिन शिरसाठ, प्रकाश चौधरी, भुरा लोहार, निखिल महाजन, कुणाल गिरासे, राहुल बंजारा, विशाल पावरा, विश्वास भिल, मयुरेश पवार, हितेश पाटील, समीर शेख, कपिल वाणी, राहुल बोरसे, मुकेश पाटील आदींनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.