शिरपूर : शिरपूर पॅटर्न बंधारा प्रारंभ

शिरपूर : शिरपूर पॅटर्न बंधारा प्रारंभ
Published on: 
(मेन करणे) SHC26B13571 तऱ्हाडकसबे (ता. शिरपूर) : बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपुजन करताना आमदार काशीराम पावरा, भूपेशभाई पटेल व पदाधिकारी. ------ शिरपूर पॅटर्न बंधाऱ्याच्या कामास प्रारंभ तऱ्हाडकसबे येथे साडेपाच कोटी लिटर पाण्याचे होणार पुनर्भरण सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ३ : तऱ्हाडकसबे (ता. शिरपूर) येथे शिरपूर पॅटर्न अंतर्गत बंधाऱ्याच्या कामाला आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते नुकताच समारंभपूर्वक प्रारंभ झाला. माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल अध्यक्षस्थानी होते. या कामासाठी माजी खासदार (कै.) मुकेशभाई पटेल यांची कन्या मेहा पटेल (अहमदाबाद) यांनी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टमार्फत निधी उपलब्ध करुन दिला आहे. मेहा पटेल यांच्यातर्फे तालुक्यात जलसंधारणाच्या कामासाठी दरवर्षी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जातो. गेल्यावर्षी १४ बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून, त्या निधीमधून उभारण्यात येत असलेला हा २७ वा बंधारा आहे. तर शिरपूर पॅटर्न मालिकेतील ४८० वा बंधारा आहे. आमदार अमरीशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून बंधाऱ्यांची ही मालिका साकारली जात आहे. या वेळी शांतीलाल अहिरे, माजी सरपंच कैलास भामरे, शिरपूर पॅटर्नचे प्रकल्प संचालक टी. आर. दोरीक, पांडुरंग भामरे, भैय्या भामरे, विनायक भामरे, युवराज पाटील, मनोहर भामरे, संजय पाटील, तुकाराम कोळी, नीळकंठ पाटील, महेश पाटील, हिंमतसिंह राजपूत, भिमसिंग वंजारी, सुभाष पाटील, निंबा पाटील, अनिल पाटील, डिगंबर पाटील, अविनाश पाटील, भिमराव पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते. साडेपाच कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण तऱ्हाडकसबे येथील बंधाऱ्यासाठी सुमारे ४३ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. बंधाऱ्याची लांबी ४० मीटर असून, १५ ते २० फूटापर्यंत खोलीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे दोन कोटी ६५ लिटर पाणीसाठा निर्माण होणार असून, सुमारे साडेपाच कोटी लिटर पाणी जमिनीत मुरवले जाऊन पुनर्भरण होणार आहे. रस्ते विकासाला हातभार बंधाऱ्यांच्या कामामुळे जल संधारणाचा हेतू साध्य होण्यासह ग्रामीण भागात वाहतुकीसाठी रस्ते तयार करण्यासही मोठी मदत झाली आहे. आतापर्यंत शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांच्या मालिकेंतर्गत सुमारे १९० किमीचे नाला खोलीकरण करण्यात आले आहे. बाहेर काढलेल्या मातीचा उपयोग करुन सुमारे १६० किमी अंतराचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. दोन हजार कोटी लिटर पाणीसाठा पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग शेती आणि भूजल पुनर्भरणासाठी करणे हे शिरपूर पॅटर्न बंधार्‍यांचे मुख्य तत्व आहे. आतापर्यंत ४७५ बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असून, त्यांच्या माध्यमातून सुमारे दोन हजार कोटी लिटर पाणीसाठा निर्माण होण्याची तजवीज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.