शिरपूर : रथोत्सव बातमी

शिरपूर : रथोत्सव बातमी
Published on: 
(पान ४ ला मेन) SHC26B13517, SHC26B13518 शिरपूर : वरचे गाव येथील बालाजी मंदिर. दुसऱ्या छायाचित्रात खालचे गाव येथील बालाजी मंदिर. ------- दोन रथोत्सवासाठी शिरपूर नगरी सज्ज दीड शतकांची परंपरा, विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २० : येथील दीड शतकांपेक्षा अधिक जुनी परंपरा असलेल्या वरचे गाव आणि खालचे गाव बालाजी संस्थानतर्फे रथोत्सवांची तयारी पूर्ण करण्यात आली असून, त्यापूर्वीचा वहनोत्सव आणि अन्य धार्मिक कार्यक्रम भाविकांच्या उदंड प्रतिसादात सुरू आहे. दोन रथोत्सवांची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असल्यामुळे शिरपूरला धार्मिक क्षेत्रात श्री बालाजी नगरी या नावाने ओळखले जाते. येथील खालचे गाव श्री प्रति तिरूपती बालाजी मंदिराच्या रथोत्सवाला १५७ वर्षांची परंपरा लाभली आहे. संस्थानतर्फे वहनोत्सवासह दैनंदिन स्वरुपात विविध अनुष्ठाने, यज्ञयाग पार पाडले जात आहेत. संस्थानचा रथोत्सव आश्विन शुद्ध एकादशी, २२ ऑक्टोबरला होणार असून, सकाळी रथपूजा, त्यानंतर रथोत्सव आणि सायंकाळी आकर्षक विद्युत रोषणाईयुक्त चलत देखावे आदी कार्यक्रम होणार आहेत. तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते रथाची महापूजा होणार आहे. आमदार अमरिशभाई पटेल अध्यक्षस्थानी असणार आहेत. आमदार काशीराम पावरा, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी उपस्थित राहतील. संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष गोपाल भंडारी, चिटणीस चिंतनभाई पटेल, कोशाध्यक्ष शैलेंद्र अग्रवाल, सहचिटणीस हिरालाल बारी, विश्वस्त द्वेता करण नथवाणी, खालचे गाव येथील श्री बालाजी मित्र मंडळ, न्यू बालाजी मित्र मंडळ, श्री सूर्यवंशी बारी समाज नवयुवक मंडळ, श्री भोई समाज तरुण मित्र मंडळांनी संयोजन केले आहे. ------- वरचे गावचा रथोत्सव येथील १५१ वर्षांची परंपरा लाभलेला श्री वरचे गाव व्यंकटेश बालाजी संस्थानचा रथोत्सव २३ ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे. जळगाव येथील श्रीराम मंदीर संस्थानचे वहिवाटदार डॉ. ह.भ.प. मंगेश महाराज तथा गुरु बाळकृष्ण महाराज जोशी यांच्या हस्ते रथाची महापूजा केली जाणार आहे. आमदार अमरिशभाई पटेल अध्यक्षस्थानी असतील. आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, डीवायएसपी सुधीर पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, कि.वि.प्र. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे उपस्थित राहतील. संस्थानचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल, कार्याध्यक्ष झेंडूसिंग पाटील, उपाध्यक्ष दिलीप लोहार, उत्तमराव माळी, चिटणीस श्यामकांत ईशी, सहचिटणीस भूपेश अग्रवाल, कोशाध्यक्ष विशाल माहेश्वरी, सहकोशाध्यक्ष किरण दलाल, प्रमुख सल्लागार डिगंबर माळी, विजयसिंह गिरास आदींनी संयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com