धुळे ः टुडे १ साठी, सेकंडमेन.........(पानाच्या डाव्या बाजूला, संक्षीप्त जवळून)
--
तीन किंवा चार कॉलमात फोटो क्रमांक ः 33141
दहिवद : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्यात गळीत हंगामानिमित्त बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यात मंगळवारी पूजन करताना काशिराम पावरा. शेजारी अमरिशभाई पटेल, माधवराव पाटील, के. डी. पाटील, चिंतन पटेल, अंकित गोयल, दिलीप पटेल, राहुल रंधे आदी.
--
शिरपूरला बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा
-
माँ रेवा शुगर्स : नोव्हेंबरच्या सुरुवातीला गळीत हंगाम सुरू
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. २० : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शिवाजीनगर- दहिवद येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित माँ रेवा शुगर्स प्रा. लि. येथे २०२६- २०२७ च्या गळीत हंगामानिमित्त मंगळवारी (ता. २०) बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला. कारखान्याची भरभराट व्हावी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधले जावे, यासाठी आमचे पूर्ण पाठबळ राहील. कारखान्याचा हा पुनरारंभ तालुक्यासाठी आनंदाचा दिवस आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.
आमदार पटेल अध्यक्षस्थानी होते. आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते आणि माँ रेवा शुगर्सचे संचालक अंकित गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. नगराध्यक्ष चिंतन पटेल, कारखान्याचे अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीप पटेल, संचालक के. डी. पाटील, वासुदेव देवरे, राहुल रंधे, धनंजय पाटील, नारायणसिंग चौधरी, संग्रामसिंग राजपूत, भरत पाटील, सुचिता पाटील, प्रकाश चौधरी, ॲड. बाबा पाटील, तसेच अधिकारी, विभागप्रमुख, अभियंते, कृषी अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी, सभासद उपस्थित होते.
-
पूर्णपणे पाठबळ देऊ
आमदार पटेल म्हणाले, की माँ रेवा शुगर्सच्या माध्यमातून साखर कारखाना सुरळीतपणे सुरू राहणे, त्याची भरभराट होणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधले जाणे महत्त्वाचे आहे. कारखान्याच्या प्रगतीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपले पूर्ण समर्थन आणि पाठबळ राहील. कारखान्याने संबंधित सर्व घटकांना लाभ मिळवून द्यावा. आमदार पावरा म्हणाले, की कारखाना सुरळीत चालण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत योग्य निर्णय घ्यावेत, जेणेकरून तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल. सरव्यवस्थापक गणेश यादव यांनी सांगितले, की यंदा गळीत प्रक्रिया अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल. ऊसतोडणी व वाहतूक वेळेत पूर्ण करण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज असून, येत्या नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रत्यक्ष गळीत हंगामाला सुरुवात होईल.
-