SHC26B13461
शिरपूर : विजेत्या कुस्तीपटू विद्यार्थिनींचे कौतुक करताना सचिव निशांत रंधे, प्राचार्या सारिका रंधे.
----------
रंधे विद्यालयाच्या विद्यार्थिनी
कुस्ती स्पर्धेत चमकल्या
शिरपूर, ता. ७ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व जिल्हा क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय नाशिक विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील रंधे कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळविले.
इयत्ता नववीतील गौरी महेंद्र कोळी हिने १४ वर्षांखालील ३६ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे तिची खोपोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गौरी कोळी हिने विभागीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत आपल्या गटात अव्वल स्थान मिळविले. याच स्पर्धेत विद्यालयाची खेळाडू श्रुती महेंद्र कोळी हिनेही उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, कोशाध्यक्षा आशाताई रंधे, नगरसेवक रोहित रंधे, राहुल रंधे, शशांक रंधे, व्यवस्थापक बापू कापडे व विश्वस्त मंडळाने कौतुक केले. मुख्याध्यापिका सारिका रंधे, उपमुख्याध्यापक एस. डी. न्हासदे, पर्यवेक्षिका उषा पाटील, क्रीडाशिक्षक एम. टी. चित्ते, पालक डॉ. महेंद्र कोळी आदींनी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक केले.