शिरपूर : खालचे गाव रथोत्सव बातमी

शिरपूर : खालचे गाव रथोत्सव बातमी
Published on: 
SHC26B13539, SHC26B13538 शिरपूर : खालचे गाव बालाजी संस्थानच्या रथोत्सवात सहभागी भाविक. दुसऱ्या छायाचित्रात रथारुढ श्री बालाजींना अभिवादन करताना भूपेशभाई पटेल. ------- शिरपूरला ‘लक्ष्मी रमणा गोविंदा’चा गजर प्रति तिरूपती श्री बालाजी संस्थानच्या रथोत्सवात गर्दी सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २४ : ‘लक्ष्मी रमणा गोविंदा’ आणि ‘जय बालाजी’चा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, विविध देखावे आणि हजारो भाविकांची मांदियाळी अशा वातावरणात येथील १५७ वर्षांची परंपरा लाभलेला खालचे गाव प्रति तिरुपती श्री बालाजी संस्थानचा रथोत्सव २२ ऑक्टोबरला साजरा करण्यात आला. सकाळी तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते रथाची महापूजा करण्यात आली. आमदार काशीराम पावरा, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, डीवायएसपी सुधीर पाटील, पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, शिल्पकार रवि शिल्पी, श्रीराम मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. सतिषदास महाराज, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शांताराम महाजन, काशीनाथ राऊळ, बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, देवेंद्र पाटील, बबनराव चौधरी, शरद अग्रवाल, राजू टेलर आदी उपस्थित होते. संस्थानच्या परंपरेनुसार, मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, वहनोत्सव आणि रथोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध घटकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. मुरलीधर स्वर्गे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मानाची पाच पावले ओढल्यानंतर रथोत्सवाला सुरवात झाली. पारंपारिक मार्गावरुन रथारुढ श्री बालाजींची मिरवणूक काढण्यात आली. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी श्री बालाजींचे दर्शन घेतले. विविध मंडळे, प्रतिष्ठानांतर्फे भाविकांसाठी शीतपेय, पेयजल व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष गोपाल भंडारी, चिटणीस चिंतनभाई पटेल, कोशाध्यक्ष शैलेंद्र अग्रवाल, सहचिटणीस हिरालाल बारी, विश्वस्त द्वेता नथवाणी, विश्वस्त डॉ. सुभाष भंडारी, डॉ. नितिन वैद्य, सुरेश गुजराथी, विजय धाकड आदींनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com