पान-१ मेन आहे.
----------------
हा फोटो ३ कॉ वापरावा
PML26B10259
शिरवाडे वणी (ता. निफाड) ः महामार्गावरील येथील चौफुलीवरील अपघातस्थळ.
----------
हा फोटो २ कॉ
PML26B10261
पिंपळगाव बसवंत ः शिरवाडे वणी चौफुलीवरील अंडरपास उभारणीसाठी खासदार भास्कर भगरे यांना निवेदन देताना अशोक निफाडे व नागरिक.
---------------------
शिरवाडेवणी चौफुलीवर अंडरपास उभारा
जनआंदोलनाचा नागरिकांचा इशारा ः सदोष रचनेमुळे अपघात आणि वाहतूक कोंडी नित्याचीच
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.२३ ः मुंबई- आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणी चौफुली सदोष रचनेमुळे अपघातस्थळ बनले आहे. सततचे अपघात व वाहतूक कोंडीमुळे शिरवाडे वणीच्या नागरिकांना जीवमुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे.वाहतुकीमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आज शिरवाडे वणी चौफुलीवर एकत्र येऊन अंडरपास व सर्व्हिस रोड उभारण्याचे जोरदार मागणी केली.याबाबत पावले न उचलल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. याबाबत खासदार भास्कर भगरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
--------------
पिंपळगाव बसवंतपासून आठ किलोमीटरवर शिरवाडे वणी चौफुली आहे. महामार्गापासून उत्तरेला वडनेर भैरव तर दक्षिण बाजूला शिरवाडे वणी गावाकडे रस्ते जातात. वाढलेल्या प्रचंड वाहतुकीमुळे येथे अंडरपास न उभारल्याने हे स्थळ दुर्घटनेला आमंत्रण देणारे ठरले आहे. येथे गेल्या पाच वर्षात सात जणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. महामार्गावरून दुतर्फा वाहने सुसाट येत असतात. त्यामुळे शिरवाडे व वडनेरच्या नागरिकांना महामार्ग ओलाडतांना मोठी कसरत करावी लागते. यापूर्वी नागरिकांनी अंडरपासची मागणी केली. पण महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे डोळेझाक केली. किती अपघाताची इष्टांकपूर्ती झाल्यानंतर अंडरपासचे काम प्रशासन हाती घेणार आहे असा उपरोधिक प्रश्न शिरवाडेच्या नागरिकांनी उपस्थित केला.
निवेदनाची दखल घेत खासदार भगरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. शिरवाडे फाट्यावरील अंडरपासचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी सरपंच अशोक निफाडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी खासदार भास्कर भगरे यांची भेट घेत व्यथा मांडली. त्यावर तात्काळ दखल घेत खासदार भगरे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना पत्र पाठविले आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी तात्काळ अंडरपास व उपरस्त्याची उभारणीची सूचना महामार्ग प्राधिकरणाला द्यावी, असे पत्रात नमूद केले आहे. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी शशांक आडके, संदीप लखहोत्रा याबाबत खासदार भगरे यांनी चर्चा केली. रामराव भालेराव, सुदाम थेटे, बाळासाहेब निफाडे, शिवाजी निफाडे, अरूण निफाडे, सुनील निफाडे, गणेश पगार, खंडू शिरसाट, अक्षय निफाडे, आबा निफाडे, दत्तू निफाडे, भास्करराव निफाडे आदी उपस्थित होते.
----------
कोट
शिरवाडे फाट्यावरील वाहतूक सध्या अतिसंवेदनशील बनली आहे. सातत्याने अपघात घडत आहे. सदोष उभारणीमुळे आतापर्यंत सात नागरिकांचे प्राण अपघात गमावले आहे. यातून बोध घेऊन महामार्ग प्राधिकरणाने अंडरपास उभारणीचे काम तात्काळ हाती घ्यावे अन्यथा जनआंदोलन उभारणार आहे.
- अशोक निफाडे, माजी सरपंच, शिरवाडे वणी
---------
२०-२ चौकट
महामार्ग प्राधिकरणाचे वरातीमागून घोडे
मुंबई- आग्रा महामार्गाचे चौपदरीकरण झाले तेव्हा धुळे ते नाशिक दरम्यान अनेक ठिकाणी महामार्गाच्या रचनेबाबत नागरिकांनी आक्षेप घेत आंदोलने उभारली होती. यात वडाळीभोई, उमराणे, पुरमेपाडा, ओझर येथील नागरिकांनी उड्डाणपुलाची मागणी केली होती. या मागणीकडे तेव्हा सरळसरळ दुर्लक्ष कऱण्यात आले होते. कालांतराने उमराणे येथे उड्डाणपूल उभारण्यात आला. वडाळीभोई येथे दोन्ही बाजूने रस्ते उड्डाणपुलाला जोडण्यात आले. पुरमेपाडा येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ओझर येथे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मुळात महामार्गाची रचना करताना भविष्यातील पन्नास वर्षातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे असते. मग त्याचा विचार तेव्हा का होत नाही? आज शिरवाडे वणी फाट्याबाबतही तीच स्थिती आहे. कालांतराने पुन्हा ही गरज पुढे येईल अन नवीन टेंडर काढले जाईल. मुळात आता जे करणे गरजेचे आहे, ते का टाळले जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-----------------