Police Bandobast
sakal
नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी गुरुवारी (ता. १९) शहर सज्ज झाले आहे. झेंडे अन् पताकांमुळे अवघे शहर भगवेमय झाले आहे. शिवजयंतीनिमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गांवरही भगव्या झेंड्यांमुळे अधिकच भारावलेले वातावरण आहे. दरम्यान , मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी सुमारे दीड हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे.