Nashik Shiv Jayanti
sakal
नाशिक: गुरुवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून, नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका आटोपल्या आहेत. त्यामुळे यंदाची शिवजयंती मोठ्या दणक्यात साजरी होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयातर्फे पोलिस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका सुरू असून, या बैठकांमध्ये पोलिसांकडून शिवजयंती उत्साहात साजरी करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. तसेच ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे वाजविण्यास बंदी असून, त्याऐवजी पारंपरिक वाद्य वाजविण्याचे आवाहन केले जात आहे.