Nashik rural road disputes resolved under Shiv Panand schemeesakal
नाशिक
Nashik Road New Rules : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या वादावर कायमचा तोडगा; शिव पाणंद रस्ते चळवळीअंतर्गत नवीन नियम
Shiv Panand Rural Roads Movement Explained : शिव पाणंद रस्ते चळवळ अंतर्गत ग्रामीण व शेतांमधील रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देऊन अतिक्रमण दूर करण्याचे शासनाचे पाऊल; गावपातळीवरील वाद मिटविण्याचा नवा मार्ग.
नाशिक: शिव पाणंद रस्ते चळवळीअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते व शेतांमधून जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणे दूर करताना या रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहेत. शासनाने त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली असून, यामुळे गावपातळीवरील वाद संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.