फक्त शहर टुडे पान दोनसाठी
-------------
(दोन्ही फोटो पेस्टेड दाखवतील जिल्हा टुडेला घेतले आहे)
RV126B08720 व RV126B08719
रावेर : शहरात शुक्रवारी निघालेल्या जनआक्रोश मोर्चात सहभागी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी. दुसऱ्या छायाचित्रात नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांना निवेदन देताना आमदार अंबादास दानवे, उपनेते गुलाबराव वाघ, प्रल्हाद महाजन, योगिराज पाटील, अशोक शिंदे, श्याम भामरे आदी.
------------------------------------
पाच हजारांत दिवाळी साजरा करून दाखवा
------------
आमदार अंबादास दानवे : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची राज्य शासनाकडून थट्टा
सकाळ वृत्तसेवा
रावेर, ता. २३ : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनातर्फे पाच हजार रुपये देऊन थट्टा केली जात आहे. यात दिवाळी कशी साजरी होणार?. शिवसेनेतर्फे मंत्र्यांना पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन दिवाळी साजरी करून दाखवा, असे आवाहन विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व आमदार अंबादास दानवे यांनी येथे शुक्रवारी (ता.२३) केले.
शेतकऱ्यांचे सरसकट संपूर्ण कर्ज व वीजबील माफ करावे यांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी आमदार दानवे बोलत होते.
आमदार दानवे म्हणाले की, राज्यावर ११ लाख कोटींचे कर्ज झाले आहे. महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. राज्य शासनाकडे गरज नसताना शक्तीपीठ व मेट्रोसाठी करोडो रुपये खर्च करायला तयार आहे. मात्र, शेतकऱ्यांना देण्यासाठी केवळ पाच हजार रुपये आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. उद्योगपतींचे कर्जमाफ केले जाते. मात्र, शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली जात नाही. केळीला फळाचा दर्जा मिळावा, शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी आपण विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे श्री. दानवे यांनी सांगितले. उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हा समन्वयक प्रल्हाद महाजन, जिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांनी वाढती महागाई शेतकऱ्यांची जाण नसलेले सरकार असल्याची टीका केली. सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले. प्रास्ताविक रवींद्र पवार यांनी केले.
---------
ठळक मागण्या...
*जीवनावश्यक वस्तूचे वाढीव भाव कमी करून दोन महिन्यापूर्वीचे भाव निश्चित करून वर्षभर स्थिर ठेवावे.
*शेतकऱ्यांचे सरसकट संपूर्ण कर्ज व वीज बिल माफ करावे.
*अग्रीम पाच हजार रद्द करून एकत्रित एक रकमी एक लाखाची मदत करावी.
*बीपीएलधारक शेतमजूर असंघटित कामगार यांना स्वस्त धान्य दुकानदारामार्फत २५ हजार रुपयांची मदत त्वरित द्यावी.
*लाडक्या बहिणींना सरसकट एकवीसशे रुपये त्वरित द्यावे.
*शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता सरसकट घरकुल लाभार्थीना पाच लाख रुपये मदत मिळावी.