बैठकी नंतर ही शिवसेना समाधानी नाही

बैठकी नंतर ही शिवसेना समाधानी नाही
Published on: 
समन्वय बैठकीनंतरही शिवसेना असमाधानी आमदार भोळेंच्या उपस्थिती; निधी समान वाटपाची शिंदे गटाची मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : जिल्हा नियोजन मंडळाच्या दलितेतर वस्ती सुधारणा निधीच्या वाटपावरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात निर्माण झालेला वाद समन्वय बैठकीनंतरही कायम आहे. आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊन निधी वाटपात बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, या वाटपावर शिवसेनेच्या नगरसेवकांचे समाधान झालेले नसल्याचे गटनेते विष्णू भंगाळे यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या महासभेत जिल्हा नियोजन मंडळाच्या सुमारे २ कोटी ४९ लाख रुपयांच्या दलितेतर वस्ती सुधारणा निधीच्या वाटपावरून दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली होती. भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागांत अधिक निधी दिल्याचा आक्षेप शिवसेनेच्या शिंदे गटाने घेतला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांत समन्वय साधून निधीचे वाटप करण्याचे ठरले होते. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात आमदार भोळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महापौर दीपमाला काळे, भाजपचे सभागृहनेते नितीन लढ्ढा, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रकाश बालाणी, उपमहापौर मनोज चौधरी, शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे आणि ललित कोल्हे आदी उपस्थित होते. बैठकीत भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागांतील काही निधी कमी करून तो शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागांत देण्यात आल्याचे सांगण्यात आले. काेट निधी वाटपाबाबत दाेन्ही गटाच्या गटनेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर समान निधी वाटप करण्यात आला. त्यावर दाेन्ही गटातर्फे समाधान व्यक्त करण्यात आले. - सुरेश भाेळे, आमदार,जळगाव ........ विकास कामाचा निधी वाटपाबाबत बैठकिनंतरही आमच्या सदस्यांचे समाधान झालेले नाही. महायुतीतील दाेन्ही पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागात समान वाटप व्हावे. - विष्णू भंगाळे, गटनेते मनपा. शिवसेना. ..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com