धुळे : टुडे पान २ साठी...
--
फोटो क्रमांक : 35288
अंबोडे (ता. धुळे) : पारखे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन दिवाळीनिमित्त आर्थिक मदत व साडी-चोळी सुपूर्द करताना हिलाल माळी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी.
--
पारखे कुटुंबाला शिवसेनेची ५१ हजारांची मदत
--
महापुरात गमावले आप्त; दिवाळीत पदाधिकाऱ्यांची सांत्वनपर भेट
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : जुलैमधील मुसळधार पावसामुळे मुकटी (ता. धुळे) गाव परिसरात ओढवलेल्या भीषण महापुरात अंबोडे (ता. धुळे) येथील आनंदा पारखे व त्यांचा तरुण मुलगा वाहून गेल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत कुटुंबातील कर्ता व्यक्ती आणि मुलगा एकाच वेळी हिरावल्या गेल्याने पारखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशा कठीण प्रसंगात या कुटुंबाला भावनिक व आर्थिक आधार देण्यासाठी दिवाळीच्या सणाचे औचित्य साधत शिवसेना धुळे जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पारखे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.
-
दिवाळी हा आनंद, रोषणाई आणि आपुलकीचा सण असला, तरी पारखे कुटुंबासाठी यंदा हा सण केवळ दुःखद आठवणी घेऊन आला होता. ही जाणीव ठेवून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कुटुंबीयांची विचारपूस केली. यावेळी कुटुंबातील महिलेला साडी-चोळी भेट देऊन दिवाळीच्या आनंदात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच सामाजिक उत्तरदायित्वापोटी शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने पारखे कुटुंबाला ५१ हजार रुपयांची रोख आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजातील अतिसंकटग्रस्त घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत केले. शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, उपजिल्हाप्रमुख देवराम माळी, तालुकाप्रमुख तुषार भामरे, तालुकाप्रमुख चंद्रकांत मस्के, संदीप चव्हाण, तालुका संघटक गितेश पाटील, शरद गोसावी, रतनपुरा येथील सरपंच दगडू माळी, किशोर देवरे, उपतालुका प्रमुख प्रविण साळुंखे, अविनाश शेलार, पिंटू सरग, विनोद चितळकर आदी उपस्थित होते.