ठाकरे गटाची नाशिकमध्ये संघटनात्मक पुनर्बांधणी

ठाकरे गटाची नाशिकमध्ये संघटनात्मक पुनर्बांधणी
Published on: 
टूडे साठी -------------- ठाकरे सेनेची संघटनात्मक पुनर्बांधणी शहरासह ग्रामीण भागात नव्या नियुक्त्या सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : आगामी राजकीय समीकरणे आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने शिवसेना (उबाठा) पक्षाने नाशिक जिल्ह्यात संघटनात्मक बदलांची प्रक्रिया सुरू केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शहरातील विधानसभा मतदारसंघांसह विविध विभागांमध्ये संघटक, समन्वयक आणि उपमहानगरप्रमुखांची नियुक्ती करून स्थानिक संघटनेची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली. जिल्हास्तरावर देवळाली येथील प्रकाश म्हस्के आणि कळवण तालुक्यातील विनोद भालेराव यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात वीरेंद्रसिंग टिळे यांच्याकडे विधानसभा संघटक, तर संजय चिंचोरे यांच्याकडे विधानसभा समन्वयकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहराच्या पूर्व विभागात सरप्रतिसिंग बल यांची उपमहानगरप्रमुख, प्रवीण जाधव यांची उपमहानगर संघटक आणि निशांत जाधव यांची उपमहानगर समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. पश्चिम विभागासाठी संतोष कहार यांची उपमहानगरप्रमुख, चेतन दाते यांची उपमहानगर संघटक आणि राजू राठोड यांची उपमहानगर समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात संजय थोरवे यांच्याकडे विधानसभा संघटक, हरी काळे यांच्याकडे विधानसभा समन्वयक, नितीन जाधव यांच्याकडे उपमहानगरप्रमुख, तर संतोष पेलमट यांच्याकडे उपमहानगर संघटकपद देण्यात आले आहे. उपमहानगर समन्वयकपदी चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक रोड विभागात स्वप्नील ओटे आणि प्रशांत भोलेराव यांच्याकडे उपमहानगरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सागर निकाळे यांची उपमहानगर संघटक, तर विजय भोलेराव यांची उपमहानगर समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघात नीलेश भंदुरे यांची महानगर समन्वयक, साहेबराव जाधव यांची विधानसभा समन्वयक आणि दीपक केदार यांची यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सातपूर विभागात अशोक पारखे यांची उपमहानगरप्रमुख, नरेश सोनवणे यांची उपमहानगर संघटक आणि किरण निगळ यांची उपमहानगर समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. सिडको विभागाची जबाबदारी देवा वाघमारे यांच्याकडे उपमहानगरप्रमुख, अतुल लांडगे यांच्याकडे उपमहानगर संघटक आणि राजेंद्र गवळी यांच्याकडे उपमहानगर समन्वयक या स्वरूपात सोपविण्यात आली आहे. ----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.