बाजार समितीला टाळे

बाजार समितीला टाळे
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी --- फोटो क्रमांक ः 35258 धुळे ः विविध मागण्यांसाठी बाजार समिती कार्यालयास टाळे ठोकताना शिवसेना ‘उबाठा’चे आंदोलक. --- बाजार समिती कार्यालयास शिवसेना ‘उबाठा’तर्फे टाळे तस्करी रोखण्याचे सभापतींकडून आश्वासन किंवा धुळे बाजार समिती कार्यालयास टाळे शिवसेना ‘उबाठा’तर्फे आंदोलन; गोवंश तस्करी रोखण्याची ग्वाही सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ ः येथील धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोजक्या व्यापाऱ्यांची दादागिरी, शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक आणि कथित गोवंश तस्करीच्या मुद्द्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी मंगळवारी (ता. १७) आक्रमक झाले. बाजार समिती प्रशासनाला जाब विचारत पदाधिकाऱ्यांनी थेट बाजार समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकून निषेध नोंदविला. दुसरीकडे गोवंश तस्करी रोखण्यासाठी बाजार समितीत ‘इअर टॅग’ कॅम्प सुरू करण्यात आल्याची माहिती सभापती योगेश पाटील यांनी आंदोलकांना दिली. आठवडे बाजाराच्या दिवशी पारोळा रोडवरील बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा इशारा ठाकरे सेनेने दिला होता. मात्र, मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यास शेतमालाच्या विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक होऊन त्यांना नाहक त्रास होईल, या विचारातून पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकत आंदोलन केले. ठाकरे सेनेच्या आंदोलकांनी बाजार समितीच्या कारभारावर गंभीर आरोप केले. समितीत विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची रजिस्टरमध्ये चुकीच्या पद्धतीने नोंद केली जाते आणि मोजक्याच लोकांना गेटपास दिले जातात. यापूर्वी २० मे २०२५ ला आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत आणि ३ नोव्हेंबर २०२६ ला गोरक्षकांच्या कारवाईत ८० ते १०० गोवंशीय जनावरे पकडली गेली होती. इतक्या गंभीर घटना घडूनही समितीने अद्याप गुन्हा दाखल का केला नाही? यामागे कोणाचे लागेबांधे आहेत का? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. तसेच खेडा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट आणि ३ ते ४ भुसार व्यापाऱ्यांच्या दादागिरीला कंटाळून शेतकरी शेजारील बाजार समित्यांकडे वळत असल्याचेही ते म्हणाले. जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, निंबा मराठे, धीरज पाटील, प्रशांत भदाणे, भरत मोरे, मनोज बंब, हेमराज पाटील, बाबाजी पाटील, आनंद जावडेकर, संगीता जोशी, अरुणा मोरे, ज्योती चौधरी, अण्णा फुलपगारे, गोकुळ बडगुजर, नितीन पाटील, प्रकाश वाघ, शिवाजी शिरसाळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.