बंडानंतर नाशिकमध्ये सेनेची परिक्षा

Sanjay Raut
Sanjay Rautesakal

नाशिक : आमदारांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तांतर घडून आल्याने शिवसेनेसाठी (Shiv sena) हा मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी शिवसेनेचे नेते मैदानात उतरले असून, आगामी महापालिकांच्या निवडणुकीतून बंडखोरी मोडून काढण्यासाठी नाशिकमध्ये शिवसेनेचा मेळावा होणार आहे. खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आले असून, हे दोन दिवस महत्त्वाचे असून, घडामोडींकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. एकप्रकारे सेनेची परिक्षाच या दौऱ्यानिमित्त होणार आहे. (shiv sena test in Nashik after rebellion maharashtra politics Nashik News)

या मेळाव्यासाठी माजी नगरसेवकांना निमंत्रणे देण्यात आली असून, मेळाव्याला कोण हजर राहतो यापेक्षा गैरहजर कोण राहणार, याकडे अधिक लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शहरी भागात बंडखोरीला थारा मिळत नसल्याचे चित्र असून, जवळपास सर्वच पदाधिकारी, माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथून लावताना शिवसेनेत मोठे बंड घडून आले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३९ आमदार गेले. त्यामुळे शिवसेनेच्या पन्नास वर्षांच्या इतिहासात हे सर्वात मोठे बंड मानले जात आहे. या बंडामुळे शिवसेना पूर्णपणे हादरून गेली आहे. बालेकिल्ल्यांना हादरे बसत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे नेते डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरत आहे.

शिवसेनेत घडलेले बंड ज्यांच्याभोवती केंद्रित झाले ते पक्ष प्रवक्ते व खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे. दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी त्यांनी वेळ दिला आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा एक मेळावादेखील आयोजित करण्यात आला असून, या वेळी शक्तीप्रदर्शन होणार आहे. शक्तीप्रदर्शन करताना उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कोण याची, चाचपणी होणार असून गैरहजर राहणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र टिम कार्यरत ठेवण्यात आली आहे. कोण येतो यापेक्षा कोण गैरहजर राहतो, यावर विशेष लक्ष राहणार आहे. विशेष करून शहरात माजी नगरसेवकांवर अधिक लक्ष ठेवले जाणार आहे. मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रणे देण्यात आल्याचे समजते.

Sanjay Raut
नाशिक : बकरी ईदनिमित्त बोकड बाजार गजबजला

माजी नगरसेवकांवर भिस्त

शिवसेनेच्या ३५ माजी नगरसेवकांवर शहराची भिस्त राहणार आहे. पाच वर्षाच्या कालावधीमध्ये संजय राऊत यांचा कायम संपर्क होता. नाशिक जिल्ह्यातून दादा भुसे व सुहास कांदे हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असले तरी शहरी भागात त्यांचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे माजी नगरसेवक सध्यातरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतच असल्याचे तूर्त दिसत आहे.

Sanjay Raut
Nashik : सांदण व्हॅली पर्यटकांसाठी बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com