
कार्यकर्त्यांचे जाळे, जनसंपर्क अन् लढण्याची क्षमता
सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘सब की पसंद गिते वसंत’ हे ब्रीद घेऊन मैदानात उतरलेल्या वसंत गिते यांची मध्य विधानसभा मतदारसंघावर पकड आहे. त्यातूनच त्या वेळी त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. कार्यकर्त्यांचा गोतावळा, सामाजिक कार्यात अग्रेसर, नगरसेवक, महापौर ते आमदार अशी पदे त्यांनी भूषविली. नामको बॅंकेचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक पदही त्यांनी भूषविले आहे. २००५ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मनसेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा राहिला. मनसेचे पक्ष संघटन बांधण्याबरोबरच महापालिकेतही त्यांनी सत्ता आणली. दमदार नेतृत्व व जुनेजाणते शिवसैनिक म्हणून वसंत गिते यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. (shiv sena ubt vasant gite ticket confirmed for central nashik vidhan sabha 2024 election Check maharashtra assembly elections candidate details)